Bollywood Actress: प्रत्येकाला आपल्या आयुष्यात इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं असतं. ज्यामुळे समाजात स्वत: ची ओळख निर्माण करता येईल. आजपर्यंत अशा अनेक राजकीय नेते तसेच कलाकारांच्या प्रेरणादायी कथा कानावर आल्या असतील. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अशीच एक अभिनेत्री जिचा फिल्मी प्रवास अनेकांसाठी प्रेरणा देणारा आहे. मात्र, बॉलिवूडच्या सुपरस्टारसोबत लग्न केल्यानंतर या नायिकेने इंडस्ट्रातून ब्रेक घेतला. या अभिनेत्री म्हणजे डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) आहे. इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्याआधी त्यांना वयाच्या १२ व्या वर्षी कृष्ठरोगाची लागण झाली होती. शिवाय एका मुलाखतीत त्यांनी यावर कशीमात केली याबद्दलही सांगितलं होतं.
अभिनेत्री डिंपल कपाडिया त्यांच्या खास अभिनय शैलीसाठी ओळखल्या जातात. अगदीच किशोरवयात त्यांनी राज कपूर यांच्या 'बॉबी' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यामुळे डिंपल यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील ऋषी कपूर आणि त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. दरम्यान, 'फिक्की फ्लो जयपुर चॅप्टर'ला दिलेल्या मुलखतीमध्ये डिंपल यांनी बॉबी मध्ये काम करण्याची संधी कशी मिळाली. याचा किस्सा शेअर केला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या माझे वडील चुन्नीभाई कपाडिया हे या क्षेत्रातील बऱ्याच लोकांना ओळख होते. त्याचदरम्यान, मला कुष्ठरोग झाला होता आणि त्याची खूण माझ्या हाताच्या कोपरावर होती.
वयाच्या १२ व्या वर्षी कुष्ठरोग झाला अन्...
त्यानंतर डिंपल यांनी सांगितलं की, मला १२ व्या वर्षी कुष्ठरोग झाला होता आणि काही काळानंतर तो बरा झाला. त्यामुळे तुला आता शाळेतून काढून टाकतील असे मला मित्र म्हणायचे. तुझ्यावर बहिष्कार टाकण्यात येईल, असं मला तो म्हणाला. त्यावेळी मी हा शब्द तेव्हा पहिल्यांदाच ऐकला होता आणि मला त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. तसंच कुष्ठरोग झाला असतानाच राज कपूर यांच्यासोबत माझी भेट झाली. त्यांनी बॉबी सिनेमासाठी विचारणा केली. तो क्षण माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय होता. मला जे काही पाहिजे होतं ते मिळालं. अशी आठवण डिंपल यांनी सांगितली. दरम्यान, प्रसिद्धीच्या शिखरावर असताना डिंपल कपाडिया यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यावेळी राजेश खन्ना आणि त्यांच्या वयामध्ये १५ वर्षांचं अंतर होतं. जेव्हा डिंपल कपाडिया यांनी राजेश खन्ना यांच्याशी लग्न केलं तेव्हा त्या १५ वर्षांच्या होत्या आणि वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्या आई झाल्या.