Join us
Daily Top 2Weekly Top 5

राधिकाच्या आधी या अभिनेत्रींचे देखील बोल्ड सीन झाले होते सोशल मीडियावर लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 12:14 IST

राधिकाच्या आधी देखील अनेक अभिनेत्रींवर चित्रीत करण्यात आलेले बोल्ड सीन सोशल मीडियावर लीक झालेले आहेत.

ठळक मुद्देअनारकली ऑफ आरा या चित्रपटात स्वरा भास्करवर चित्रीत झालेला एक सीन इंटरनेटवर लीक झाला होता. स्वराच्या या सीनची चांगलीच चर्चा झाली होती. 

राधिका आपटे लवकरच स्लमडॉग मिलेनिअर फेम अभिनेता देव पटेल याच्यासोबत द वेडिंग गेस्ट चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच ते दोघे एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटातील एक बोल्ड सीन नुकताच सोशल मीडियावर लीक झाला आहे. हा सीन प्रचंड व्हायरल होत असून राधिकावर चित्रीत झालेला बोल्ड सीन व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वी तिचे पार्च्ड सिनेमातील काही बोल्ड सीन देखील लीक झाले होते. 

द वेडिंग गेस्ट मधील हा सीन लीक झाल्यानंतर राधिका प्रचंड चिडली असून तिने मीडियाशी बोलताना सांगितले होते की, लोकांच्या मानसिकतेमुळे फक्त बोल्ड सीन लीक झाला आहे. या सीनमध्ये माझ्यासोबत देव पटेल देखील आहे. पण सीन माझ्या नावानेच लीक होत आहे. पुरुष अभिनेता देव पटेल याच्या नावाखाली हा सीन का लीक झाला नाही?

राधिकाच्या आधी देखील अनेक अभिनेत्रींवर चित्रीत करण्यात आलेले बोल्ड सीन सोशल मीडियावर लीक झालेले आहेत. अहाना कुमराचा लिपस्टिक अंडर माय बुरका या चित्रपटातील बोल्ड सीन लीक झाला होता. 

नवाझुद्दीन सिद्दीकीच्या बाबूमोशाय बंदूकबाज या चित्रपटात बिदिता बागने दिलेला बोल्ड सीन चित्रपट प्रदर्शित व्हायच्या काही दिवस आधीच लीक झाला होता. 

अनारकली ऑफ आरा या चित्रपटात स्वरा भास्करवर चित्रीत झालेला एक सीन इंटरनेटवर लीक झाला होता. स्वराच्या या सीनची चांगलीच चर्चा झाली होती. 

प्रसिद्ध पेंटर रवी वर्मा यांच्या जीवनावर आधारित रंगरसिया हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात रणवीर हुड्डा आणि नंदना सेन यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या बोल्ड सीनमुळे हा चित्रपट चर्चेत आला होता. या चित्रपटातील अनेक दृश्य सोशल मीडियावर लीक झाली होती.

 

साहेब बीवी और गँगस्टर या चित्रपटातील माही गिल आणि रणदीप हुड्डावर चित्रीत झालेली अनेक दृश्य सोशल मीडियावर लीक झाली होती.  

टॅग्स :राधिका आपटेनवाझुद्दीन सिद्दीकीरणदीप हुडा