Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडची ही अभिनेत्री म्हणते, अजूनही तरूणी घाबरतात कंडोम म्हणायला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 15:40 IST

बॉलिवूडची ही अभिनेत्री सेक्स व लैंगिक विषयावर रोख ठोक आपलं मत व्यक्त करते.

बॉलिवूडच्या कित्येक अभिनेत्री आहेत ज्या समाजात महिलांसोबत होणार भेदभाव, जातीभेद व लैंगिक संबंधीत मुद्द्यांवर आपलं रोखठोक मत मांडत असतात. या अभिनेत्रींमध्ये भूमी पेडणेकर हिचा समावेश आहे. तिने नुकतेच म्हटलं की, नेहमी महिलांसोबत असं होत आलं आहे की त्यांना कमी वयापासूनच भेदभावाला सामोरे जावे लागते. इतकंच नाहीतर एक आई आपल्या मुलांमध्येदेखील भेदभाव करते जसे की मी माझ्या मुलाच्या दुधात मलाई टाकून देईन आणि मुलीच्या ग्लासात पाणी देईन. असे भूमीने एका कार्यक्रमात सांगितलं.

भूमी पेडणेकर म्हणाली, अजूनही आपल्या देशात सेक्स म्हणजे लैंगिक संबंधाकडे एक टॅबू म्हणून बघितलं जातं. तसंच शारीरिक संबंधावेळी महिला, तरुणींना गर्भनिरोधक विचारण्याचा अधिकार आहे. पण मेडिकलमध्ये जाऊन कंडोम द्या, असं म्हणण्याचं धाडस महिला किंवा तरुणी करत नाहीत. अजूनही कंडोम म्हणायलाही तरुणी घाबरतात.

भूमी पेडणेकर सध्या तिच्या अफेयरमुळे चर्चेत आहे. भूमी बॉलिवूडच्या एका हिरोच्या प्रेमात पडल्याचे सध्या कानावर येतेय. हा हिरो कोण तर जॅकी भगनानी.

फिल्मफेअरने दिलेल्या वृत्तानुसार, भूमी व जॅकी यांच्यात सध्या एक वेगळेच बॉन्डिंग पाहायला मिळेतय. आत्तापर्यंत या दोघांत केवळ मैत्री होती. पण आता ही मैत्री यापलीकडे गेल्याचे कळतंय. इंटेक्स्ट लाइव्हनं दिलेल्या वृत्तानुसार, आता जॅकी तिला प्रोफेशनल सल्लेदेखील देऊ लागलाय.

अद्याप भूमी आणि जॅकीने आपले नाते जगजाहिर केलेले नाही. पण दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे लपून राहिलेले नाही. तूर्तास दोघांनीही आपल्या लिंकअपच्या चर्चांवर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण येत्या दिवसांत दोघेही यावर काय प्रतिक्रिया देतात, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

टॅग्स :भूमी पेडणेकर