Join us  

पंतप्रधान मोदींना भेटले हे बॉलीवुड कलाकार, गेल्या वेळेची 'ही' चूक या भेटीत टाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 7:19 PM

सिनेसृष्टीतील प्रतिनिधींमध्ये रोहित शेट्टी, राजकुमार राव, विक्की कौशल, आयुष्मान खुराना, भूमि पेडणेकर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा समावेश आहे.

बॉलीवुडच्या दिग्गजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यांत अभिनेता रणवीर सिंह, रणबीर कपूर, वरुण धवन, आलिया भट्ट यांचा समावेश होता. काही आठवड्याआधी पंतप्रधानांनी बॉलीवुडच्या निर्मात्यांची भेट घेतली आणि सिने उद्योगबाबत चर्चा केली. या भेटीनंतर सरकारने सिनेमाच्या तिकीटावरील जीएसटीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला होता. सिनेसृष्टीतील दिग्गज आणि पंतप्रधान यांची विशेष बैठक दिल्लीत होत असल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. या बैठकीचा अजेंडा अद्याप समोर आलेला नाही. निर्माता दिग्दर्शक करण जोहरने ही बैठक आयोजित केल्याचे बोललं जात आहे. सिनेसृष्टीतील प्रतिनिधींमध्ये रोहित शेट्टी, राजकुमार राव, विक्की कौशल, आयुष्मान खुराना, भूमि पेडणेकर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा समावेश आहे. १९ डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींसह चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची बैठक झाली होती. मात्र या बैठकीनंतर सोशल मीडियावर टीका झाली होती.

सिनेसृष्टींच्या प्रतिनिधींमध्ये कुणीही महिला नसल्याने दिया मिर्झासह काहींनी सवाल उपस्थित केले होते. त्यामुळेच की काय आताच्या प्रतिनिधींमध्ये आलिया भट्ट आणि भूमी पेडणेकर यांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्यावेळी महिला सदस्य नसल्याने अभिनेता-निर्माता अजय देवगण, अक्षय कुमार, करण जोहर, सिद्धार्थ राय कपूर, रितेश सिधवानी आणि इतरांवर टीका झाली होती. 

टॅग्स :करण जोहरनरेंद्र मोदीरणवीर सिंगएकता कपूरआलिया भट