Vivek Oberoi: हिंदी चित्रपटसृष्टी काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करुनही काही अभिनेते अभिनेत्री कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. त्यापैकीच आपल्या अभिनय गुणांवर प्रेक्षकांचे मन जिंकणारा अभिनेता म्हणजे विवेक ओबेरॉय.अभिनेता विवेक ओबेरॉय हा बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जायचा. २००२ मध्ये त्याने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. मात्र, आपल्या अभिनय कारकिर्दीत त्याला फारसं यश मिळालं नाही. दुर्दैवाच्या लाटेवर कायम हेलकावे खाणाऱ्या या अभिनेत्याने आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. एकेकाळी इंडस्ट्रीत विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या रायच्या अफेअरची जोरदार चर्चा झाली होती. मात्र, त्याआधी विवेकच्या आयुष्यात एक मुलगी आली होती. तिच्या निधनाने तो खूप खचला होता.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, विवेकने त्याच्या आयुष्यातील तो वाईट प्रसंगाविषयी भाष्य केलं आहे. प्रखर गुप्ता यांच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्या जुन्या आठवणी शेअर करत भावुक झाल्याचा पाहायला मिळाला. त्यावेळी तो म्हणाला, "माझी बालपणी गर्लफ्रेंड होती. तेव्हा ती १२ वर्षांची आणि मी १३ वर्षांचा होतो. त्यावेळी आम्ही डेट करत होतो.त्यानंतर मी १८ वर्षांचा आणि ती १७ वर्षांची झाल्यावर आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो. मला वाटलं, आता जे आहे ते हीच आहे. ते माझं बालपणीचं प्रेम होतं, त्यावेळी आम्ही एकमेकांना कार्ड द्यायचो.आम्ही एकत्र कॉलेजला जायचो.लग्न आणि मुलांबद्दलही आम्ही बोलायचो. मला पूर्ण खात्री होती की मी मोठा झाल्यावर तिच्याशीच लग्न करेन.माझं तिच्याबरोबरचं आयुष्य कसं असेल याची कल्पना मी माझ्या मनात केली होती. पण ती अचानक गेली. कॅन्सरमुळे तिचं निधन झालं."
सकारात्मक आणि आनंदी राहता आलं पाहिजे...
त्यानंतर अभिनेता पुढे म्हणाला, मी नेहमीच खूप भावनिक आणि संवेदनशील राहिलो आहे.त्या घटनेनंतर एक भीती माझ्या मनात घर करून गेली.पण जर एखादी व्यक्ती त्याच्या स्वभावाविरुद्ध जगली तर त्याला खूप एकटं वाटतं. म्हणून आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आले तरी सकारात्मक आणि आनंदी राहता आलं पाहिजे.
याशिवाय एक भावुक किस्सा शेअर करताना विवेक म्हणाला, "मी तिला फोन करायचा प्रयत्न करत होतो, पण ती काहीटच उत्तर देत नव्हती. त्यानंतर मी तिच्या चुलत बहिणीकडून कळालं की ती हॉस्पिटलमध्ये आहे. मी लगेचच हॉस्पिटलला पोहोचलो.पण तोपर्यंत ती या जगात नव्हती. "
Web Summary : Vivek Oberoi revealed his childhood sweetheart passed away from cancer. They were deeply in love, planning marriage. He emphasizes staying positive despite life's hardships.
Web Summary : विवेक ओबेरॉय ने बताया कि उनकी बचपन की प्रेमिका का कैंसर से निधन हो गया। वे शादी की योजना बना रहे थे। उन्होंने जीवन में सकारात्मक रहने का महत्व बताया।