Bollywood Actor Vivek Oberoi: बॉलिवूड कलाकार नेहमीच चर्चेत येत असतात. कधी ते त्यांचे चित्रपट तर कधी त्यांच्या अभिनयामुळे लक्ष वेधून घेत असतात. अनेकदा कलाकार मुलाखतींमधील त्यांच्या वक्तव्यामुळे देखील चर्चेचा भाग बनतात.त्यात आता बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत करिअरमधील कठीण काळावर भाष्य केलं आहे.
विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासनी सध्या त्यांचा आगामी चित्रपट मस्ती-४ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.येत्या २१ नोव्हेंबरला हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज होणार आहे. याच दरम्यान अभिनेता विवेक ओबेरॉयने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील कटू अनुभ शेअर केले. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, अमेरिकेत असताना त्याला पाकिस्तानातून धमकीचा फोन आला होता, असा खुलासा विवेकने या मुलाखतीमध्ये केला. त्या प्रसंगाविषयी बोलताना अभिनेता म्हणाला,"मी अमेरिकेत'कुर्बान'चित्रपटाचं शूटिंग करत होतो आणि त्यांनी (आन्सरिंग मशीन) एक धमकी मेसेज पाठवला. त्यानंतर मी तिथल्या स्थानिक प्रोडक्शन टीमने मला सांगितलं की याबद्दल तुम्ही तक्रार करावी, म्हणून मग मी तसं केलं."
पुढे विवेकने सांगितलं की, " तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी माझी चौकशी सुरु केली. तेव्हा मी त्यांना सांगितलं की, मला याबद्दल काहीच माहिती नाही, मी फक्त इथे माझ्या कामासाठी आलो आहे. त्यावेळी मला धमक्या येत होत्या, "आम्हाला माहित आहे की तू इथे आहेस, आम्ही तुला संपवू, आम्ही तुला उडवून देऊ. असं ते म्हणत होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि तो नंबर पाकिस्तानमधील असल्याचं समजलं. त्यावेळी पोलिसांनी सांगितलं की, तो खरा नंबर आहे, तेव्हा मला भीती वाटली."
रेन्सिल डिसिल्वा दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित, कुर्बान हा एक रोमँटिक-थ्रिलर चित्रपट होता.हा चित्रपट दहशतवाद आणि स्लीपर सेल्सच्या मुद्द्यावर आधारित होता.या चित्रपटात सैफ अली खान आणि करीना कपूर खानसह विवेकनेही महत्त्वाची भूमिका साकारली होती.