Vijay Verma: चिंता,तणाव या गोष्टी कुणालाच चुकलेल्या नाहीत. आयुष्यात वाईट दिवसांचा सामना केल्याशिवाय सुखाचे दिवस पाहायला मिळत नाही, हे म्हणतात तितकंच खरं! सर्वसामान्य माणूस असो किंवा एखादा कलाकार प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष हा आहेच.बऱ्याचदा यावर अनेक कलाकार खुलेपणाने बोलत असतात. अनेकांनी याचा सामनाही केला आहे आणि त्यामुळे त्यांच्या करिअरवर परिणाम झाला. याबद्दल बरेच कलाकार आपले अनुभव शेअर करत असतात अशातच अभिनेता विजय वर्माने एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील कठीण प्रसंगाविषयी भाष्य केलं आहे.
अभिनेता विजय वर्माने आजवर अनेक, चित्रपट आणि वेब सीरीजच्या माध्यमातून त्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. गलीबॉय सिनेमातील भूमिकमुळे तो आजही त्याची चर्चा होते. मात्र,एक काळ असा होता ज्यावेळी अभिनेता प्रचंड डिप्रेशनमध्ये गेला होता. या कठीण काळात त्याला आमिर खानची लेक आयरा आणि त्याचा सहकलाकार गुलशन देवैय्याने कायम साथ दिली, असंही तो म्हणाला. नुकत्याच रिया चक्रवर्तीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेता त्या वाईट काळाविषयी बोलताना म्हणाला, "त्यावेळी मी मुंबईतील एका अपार्टमेंन्ट राहायचो. सुदैवाने डोक्यावर छफ्पर आणि मोकळं आकाश पाहू शकत होतो. नैसर्गक गोष्टींच्या सानिध्यात राहिलो नाहीतर मला वेड लागलं असतं.खरंतर, मला देखील तसंच वाटत होतं."
आयरा खान अन् गुलशन मदतीला आले धावून...
त्यानंतर पुढे अभिनेत्याने सांगितलं, "एके दिवशी मला जाणवलं मी सोफ्यावरून जागचा हलतच नाहीये. काय चाललंय मला कळतंच नव्हतं. त्यावेळी आयरा आणि गुलशन माझ्या मदतीला धावून आले. तेव्हा आयरा एका चित्रपटासाठी असिस्टंट म्हणून काम बघत होती. मग आम्ही झुम कॉलवर एकत्र बोलायचो, सोबत डिनर करायचो. हेच एकमेव आमचं सर्कल होतं. मात्र, दिवसेंदिवस माझी तब्येत बिघडत होती. त्यावेळी आयराच मला म्हणाली, विजय तुला थोडीफार हालचाल करायला पाहिजे."
"अखेर मी एका थेरिपिस्टची मदत घेतली,कारण मला अक्षरश हलता येत नव्हतं.तेव्हा मला डिप्रेशनबाबत समजलं. त्यादरम्यान परिस्थिती फारच गंभीर होती. थेरिपिस्टने मला स्पष्ट सांगितलं होतं की, जर यातून बाहेर पडला नाहीस तर मग आपण औषधं सुरु करुयात.मी म्हटलं ठीक आहे." मात्र, त्यानंतर थेरिपी आणि योगामुळे खूप फरक जाणवला,असंही विजयने सांगितलं.
वर्कफ्रंट
गल्लीबॉय', 'डार्लिंग', 'जानेजान', 'दहाड़' यांसारखे सिनेमे तसेच वेबसिरीजमधून काम करत अभिनेता विजय वर्मा प्रकाशझोतात आला. मनोरंजन विश्वात चाहत्यांच्या मनावर त्याने आपल्या अभिनयाची छाप उमटवली. दमदार अभिनयाच्या जोरावर विजय वर्मा आजही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास फार काही सोपा नव्हता.
Web Summary : Vijay Varma revealed his struggle with depression, highlighting support from Ira Khan and Gulshan Devaiah. Therapy and yoga helped him recover and avoid medication. He emphasized the importance of nature.
Web Summary : विजय वर्मा ने डिप्रेशन से जूझने का खुलासा किया, जिसमें इरा खान और गुलशन देवैया के समर्थन पर प्रकाश डाला। थेरेपी और योग से उन्हें ठीक होने और दवा से बचने में मदद मिली। उन्होंने प्रकृति के महत्व पर जोर दिया।