Tiger Shroof: बॉलिवू़ड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या पावलांवर पाऊल टाकत मुलगा टायगर श्रॉफन देखील इंडस्ट्रीत स्वतची एक वेगळी ओळख निर्माण झाला. वडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे नेत टायगरने बॉलिवूडमधील लोकप्रि अभिनेत्यांच्या यादीत आपलं स्थान निर्माण केलंय. हिरोपंती या सिनेमातून त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर, टायगरने 'बागी' आणि 'वॉर' सारखे हिट चित्रपट दिले आणि स्वतःची एक अॅक्शन हिरो म्हणून ओळख निर्माण केली.टायगर श्रॉफ हा त्याच्या अभिनयासह फिटनेस आणि डान्ससाठी देखील ओळखला जातो. सध्या हा अभिनेता हा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
बॉलिवूडचा अॅक्शन स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टायगर श्रॉफने नुकताच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक खुलासा केला आहे, ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. पडद्यावर खतरनाक स्टंट करणाऱ्या टायगरला खऱ्या आयुष्यात एका समस्येने त्रस्त आहे. त्याला एअरोफोबिया (विमान प्रवासाची भीती)आहे.नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने याबद्दल खुलासा केलाय. यूट्यूबर लिली सिंगसोबत संवाद साधताना टायगर श्रॉफने खुलासा केला की, त्याला विमान प्रवासाची तीव्र भीती वाटते.काही वर्षांपूर्वीचा विमान प्रवास करताना घडलेल्या एका घटनेमुळे त्याची भीती आणखी वाढली. या मुलाखतीत अभिनेता म्हणाला," मी आता थेरपी सुरु करण्याचा विचार करत आहे, कारण मला विमानप्रवासाची भीती वाटते. जेव्हाही मला विमानप्रवास करावा लागतो, तेव्हा मला काही दिवस आधीपासूनच अस्वस्थ वाटू लागते."
पुढे टायगर म्हणाला, मी अजूनही या भीतीवर मात करू शकलेलो नाही. लोक म्हणतात की विमानप्रवास हा सर्वात सुरक्षित प्रवास आहे. मी अनेक वैमानिकांशी बोललो आहे. ते सर्व म्हणतात, टर्ब्यूलन्स म्हणजे जेव्हा विमान खराब रस्त्यावरून जाते तेव्हा जे घडतं ते इतकंच आहे. पण माझं मन हे स्वीकारायला तयार नाही.जेव्हा प्रत्यक्षात तो त्रास होतो, तेव्हा गोष्ट खूप वेगळी असते." असा खुलासा अभिनेत्याने केला.
Web Summary : Tiger Shroff reveals his aerophobia, making air travel distressing. He's considering therapy to cope with the anxiety triggered by past turbulent flights. Despite logical explanations, he struggles to overcome his fear of flying.
Web Summary : टाइगर श्रॉफ ने खुलासा किया कि उन्हें एयरोफोबिया है, जिससे हवाई यात्रा कष्टदायक हो जाती है। वह पिछली अशांत उड़ानों से शुरू हुई चिंता से निपटने के लिए थेरेपी लेने पर विचार कर रहे हैं। तार्किक स्पष्टीकरण के बावजूद, वह उड़ान भरने के डर पर काबू पाने के लिए संघर्ष कर रहे हैं।