Join us

सनी देओलने अभिनेत्यांची उडवली खिल्ली; म्हणाला, "ते कृत्य पाहून मला लाज वाटते..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 21:46 IST

Gadar 2 : बॉलिवूड आणि राजकारणात सक्रिय असलेला सनी देओल सध्या चर्चेत आहे.

बॉलिवूड आणि राजकारणात सक्रिय असलेला सनी देओल सध्या चर्चेत आहे. त्याचा आगामी चित्रपट गदर २ लवकरच प्रदर्शित होणार असून अभिनेता चित्रपटाच्या प्रचारात व्यग्र आहे. अशातच एका मुलाखतीत सनीने बॉडी शेविंग करणाऱ्या अभिनेत्यांबद्दल एक अजब विधान केले. नुकत्याच एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सनी देओलने त्याच्या चित्रपटाव्यतिरिक्त बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक पैलूंबद्दल भाष्य केले. यादरम्यान त्याने अभिनेत्यांची खिल्ली देखील उडवली. 

दरम्यान, बॉडी शेविंग केल्याने अनेकांना वाटते की आपण स्टार झालो आहोत. पण, मला असं करताना खरंच खूप लाज वाटते. जेव्हा आपण बॉडी शेविंग करतो तेव्हा असं वाटतं की आपण देखील एक मुलगी आहोत. तसेच मी आयुष्यात सिक्स-पॅक ब्स बनवण्याचा विचार कधीच केला नव्हता. कारण मला वाटते की आम्ही अभिनेते आहोत, बॉडीबिल्डर नाही. आम्ही या इंडस्ट्रीत केवळ अभिनयासाठी आलो आहोत, बॉडीबिल्डिंगसाठी नाही, असेही सनीने स्पष्ट केले. 

११ ऑगस्टरला 'गदर-२' प्रदर्शित होणार गदर एक प्रेम कथा या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात जागा केल्यानंतर आता गदर २ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. सनी देओल आता 'गदर २' मध्ये दिसणार असून त्याचा हा बहुचर्चित चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तारा सिंगचा दमदार अभिनय पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा आणि लव सिन्हा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या OMG 2 सोबत त्याची टक्कर होणार आहे. त्यामुळे दोन बॉलिवूड चित्रपटांपैकी प्रेक्षक कोणाला अधिक पसंती देतात हे पाहण्याजोगे असेल.  

टॅग्स :सनी देओलबॉलिवूडसेलिब्रिटी