Suniel Shetty: बॉलिवूडचा अण्णा म्हणून अभिनेता सुनील शेट्टी हा ९० च्या दशकातील अॅक्शन हीरोंपैकी एक आहेत.२८ वर्षांपूर्वी 'बलवान' या चित्रपटातून अभिनेता सुनील शेट्टीनेबॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याने संपूर्ण करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.मोठ्या पडद्यावर आपला जलवा दाखवणारा सुनील खऱ्या आयुष्यातही हिरो आहे. अभिनेत्याने स्वत:चा जीव धोक्यात घालून अनेक मुलींना मोठ्या संकटातून वाचवलं होतं. सुनील शेट्टीने केलेल्या त्या कृतीचं आजही कौतुक केलं जातं.
नेमकं काय घडलेलं?
१९९६ सालची ही घटना आहे. सुनील शेट्टीने त्यावेळी जवळपास १२८ मुलींना मानवी तस्कीरीपासून सुटका केली होती. ५ फेब्रुवारी १९९६ रोजी संपूर्ण कामाठीपुरा देहविक्री परिसराला पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वेढा घातला होता. त्याठिकाणाहून त्यांनी १२८ मुलींची सुखरुप सुटका केली होती. त्यामध्ये साधारण १४ ते ३० वयोगातील मुलींचा समावेश होता. आणि त्यातील बऱ्याच मुली या नेपाळमधील होत्या. त्या मुलींची सुटका केल्यानंतर नेपाळ सरकारने परत आणण्यास नकार दिला. या मुलींकडे जन्माचा दाखला किंवा नागरिकत्वाचा कोणताही पुरावा नसल्याचे नेपाळ सरकारचं म्हणणं होतं. त्यामुळे या मुलीचं काय होणार, असा प्रश्न सर्वांसमोर होता.
तेव्हा सुनील शेट्टी त्यांच्या देवासारखा मदतीसाठी पुढे आला आणि त्याने त्या १२८ मुलींना
स्वत: च्या पैशांनी नेपाळला जाण्यासाठी फ्लाइट तिकिट काढून दिले. इतकंच काय तर फ्लाइट तिकिटसोबत याची काळजी घेतली की त्या मुली स्वत: च्या घरी सुखरूप पोहोचतील.
सुनील शेट्टीने आजवर अनेक चित्रपटांतून काम केलेल्या या अॅक्शन हिरो सुनील शेट्टीला चित्रपटसृष्टीत अण्णा या नावाने ओळखलं जातं. हिंदी चित्रपटसृष्टीत 'बलवान', 'दिलवाले', 'अंत', 'मोहरा', 'गोपी किशन', 'कृष्णा रक्षक', 'बॉर्डर',' भाई',' हेराफेरी', 'धडकन' असे यशस्वी चित्रपट त्याच्या नावावर आहेत.
Web Summary : Suniel Shetty, known for his action roles, rescued 128 girls from human trafficking in 1996. He funded their flights back to Nepal after the government refused to accept them due to lack of documentation, ensuring their safe return home.
Web Summary : सुनील शेट्टी, जो अपनी एक्शन भूमिकाओं के लिए जाने जाते हैं, ने 1996 में 128 लड़कियों को मानव तस्करी से बचाया। सरकार द्वारा दस्तावेजों की कमी के कारण उन्हें स्वीकार करने से इनकार करने के बाद उन्होंने नेपाल वापस जाने के लिए उनकी उड़ानों के लिए धन दिया, जिससे उनकी सुरक्षित घर वापसी सुनिश्चित हुई।