Crazxy Movie New Song: 'तुंबाड', 'दहाड' आणि 'महाराणी' यांसारख्या चित्रपटांमुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता सोहम शाह (Sohum Shah). 'तुबांड' या त्याचा सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. या चित्रपटाच्या यशानंतर सोहम शाह एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्यासमोर येत आहे. लवकरच 'Crazxy' या त्याच्या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. येत्या २८ फेब्रुवारी २०२५ ला हा सिनेमा देशभरात रिलीज होतोय. अलिकडेच चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच रिलीज करण्यात आला. हा ट्रेलर पाहून सिनेरसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यानंतर आता या चित्रपटातील एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. 'गोली मार भेजे में' असं नव्या गाण्याचं नाव असून सध्या हे गाणं ट्रेंड होतं आहे.
नुकताच सोशल मीडियावर सोहम शाह फिल्म्सद्वारे एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून मधील 'Crazxy' मधील नव्या गाण्याची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अगदी काही दिवसांपूर्वी 'Crazxy' चित्रपटातील पहिलं 'अभिमन्यू' गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्यातील सोहम शाहचा जबरदस्त लूक प्रेक्षकांना खूपच आवडला होता. त्यानंतर आता हे दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्यात अभिनेत्याचा एक कधीही न पाहिलेला अंदाज पाहायला मिळत आहे. याशिवाय त्याच्या अफलातून डान्सने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.
'गोली मार भेजे में' या गाण्याला लोकप्रिय गायिका ईला अरुण, परोमा दास गुप्ता आणि सिद्धार्थ बसरुर यांनी आपला आवाज दिला आहे. तर विशाल भारद्वाज यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. सध्या या नव्या गाण्याला संगीतप्रेमींनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. शिवाय या चित्रपटाची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे.