Join us

'तो' एक आरोप अन् अभिनेत्याचं नुकतंच सुरू झालेलं करिअर झटक्यात संपलं! आता कुणाच्या लक्षातही नाही नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:29 IST

बलात्काराचा आरोप अन् अभिनेत्याचं करिअर झालं उद्ध्वस्त,  १० वर्षापासून झगमगत्या दुनियेपासून आहे दूर

Shiney Ahuja: हिंदी चित्रपटसृष्टीत कायम दुर्दैवाच्या लाटांवर हेलकावे खात आपल्या जिद्दीच्या जोरावर यशस्वी झालेल्या पण नावापेक्षा बदनामीने चर्चेत आलेलं नाव म्हणजे अभिनेता शायनी अहुजा. २००५ साली शायनी अहूजाने  'हजारो ख्वाहिंशे ऐसी' या चित्रपटातून त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं.  त्यानंतर अभिनेत्याच्या करिअरला कलाटणी मिळाली. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालणाऱ्या या अभिनेत्याला त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी फिल्मफेअरही मिळाला होता.

शायनी अहूजाने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले. 'गँगस्टर','वो लम्हे', 'लाइफ इन मेट्रो', 'भूल भुलैया' अशा अनेक चित्रपटांमध्ये तो झळकला.  सध्या हा  अभिनेता झगमगत्या दुनियेपासून दूर आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना अभिनेत्याच्या एका चुकीमुळे त्याचं संपूर्ण करिअर  क्षणार्धात उद्ध्वस्त झालं. 

मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप अन्...

२००९ मध्ये घरातील मोलकरणीने बलात्कारासारखा गंभीर आरोप लावल्यानंतर अभिनेत्याच्या करिअरला उतरती कळा लागली. या प्रकरणी त्याला ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण, सध्या शायनी अहूजा जामिनावर बाहेर आहे. या गंभीर आरोपानंतर अभिनेत्यासोबत कोणी काम करायलाही तयार नव्हतं.अखेरचा तो २०१५ मध्ये आलेल्या 'वेलकम बॅक' चित्रपटात दिसला होता. मीडिया रिपोर्टनुसार, शायनी आहुजा सध्या फिलीपिन्समध्ये वास्तव्यास आहे. तिथे तो त्याच्या कुटुंबासोबत सुखी जीवन जगत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shiney Ahuja: Rape Accusation Ended Actor's Career; Now Forgotten

Web Summary : Shiney Ahuja's promising Bollywood career, marked by early success, crumbled after a rape accusation in 2009. Convicted and later released on bail, he faced industry ostracization. He last appeared in 'Welcome Back' (2015) and reportedly lives in the Philippines.
टॅग्स :शायनी अहुजाबॉलिवूड