Join us

Salman Khan : सलमान खानचं लगीन झालं? स्वतःच व्हिडिओ शेअर करत केली अशी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 18:54 IST

सलमानने पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये सलमानने त्याच्या लग्नासंदर्भात, असे काही भाष्य केले आहे, जे ऐकूण कुणीही बघतच बसेल. 

नवी दिल्ली - सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय असतो. चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी तो नेहमीच काही ना काही पोस्ट करत असतो. आता त्याने एक असा व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये सलमानने त्याच्या लग्नासंदर्भात, असे काही भाष्य केले आहे, जे ऐकूण कुणीही बघतच बसेल. 

सलमान खानचंलग्न झालं? सलमान खानने (Salman Khan) इंस्टाग्राम अकाउंटवर आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो, त्याने लग्न केले असल्याचे सांगताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे, की फिल्म 'हम आपके हैं कौन' मधील प्रेम सलमान खानला विचारतो, 'आणि लग्न?' यावर सलमान म्हणतो, 'झालं.' हे ऐकूण प्रेमला आश्चर्याचा धक्का बसतो. या व्हिडिओ सोबत सलमानने कॅप्शनदेखील लिहिले आहे. यात तो म्हणतो, 'झालं की नाही... जाणून घेण्यासाठी परवा बघा.' खरे तर हा व्हिडिओ, एका कंपनीच्या जाहिरातीचा आहे, ज्याला सलमानही दुजोरा देत आहे.

 

सोनाक्षीसोबत व्हायरल झाला होता फोटो -काही दिवसांपूर्वी सलमान खानचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात तो सोनाक्षी सिन्हाला वधूप्रमाणे अंगठी घालताना दिसला होता. मात्र, हा फोटो फेक निघाला. अनेकांनातर हे खरेही वाटले होते. यावर सोनाक्षीनेही प्रतिक्रिया दिली होती. तिने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोवर कमेंट करताना म्हटले होते, “तुम्ही एवढे मूर्ख आहात का, की खऱ्या आणि मॉर्फ्ड फोटोतील फरकही सांगता येऊ नये." 

टॅग्स :सलमान खानलग्नइन्स्टाग्राम