रणदीप हुड्डा हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. रणदीप सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्याबाबत तो चाहत्यांना अपडेट्स देत असतो. आता नुकतंच त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून चाहते चिंतेत आहेत.
रणदीपचा या फोटोमध्ये वेगळाच लूक दिसत आहे. त्याच्या डोक्यावरील मध्यभागाचे केस कमी झाल्याचं दिसत आहे. तर डोळ्यावर मोठा चष्मादेखील लावल्याचं दिसत आहे. "What’s the tea for this Tuesday? Coffee isn’t the only thing that’s brewing", असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी रणदीपचा सिनेमातील हा नवा लूक असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमातील हा लूक आहे अशा कमेंट केल्या आहेत.
रणदीप हुड्डाने 'स्वातंत्र्यवीर सावरकर', 'हायवे', 'सरबजित', 'जिस्म', 'सुलतान' अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच त्याचा 'जाट' हा सिनेमा प्रदर्शित झाला. काही वेब सीरिजमध्येही त्याने काम केलं आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' आणि सरबजित या सिनेमातील त्याच्या भूमिका प्रचंड गाजल्या.