Rahul Dev: ‘चॅम्पियन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता म्हणजे राहुल देव. करिअरिमधील पहिल्याच चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्तम खलनायक या पुरस्कारसाठी नामांकन मिळवून त्याने सर्वांचं लक्ष स्वत कडे वेधून घेतलं.या चित्रपटानंतर त्याने ‘इंडियन’, ‘आशिक’, ‘आवारा पागल दीवाना’ या चित्रपटांमध्येही काम केलं आणि त्याच्या करिअरचा आलेख चढता राहिला. मात्र, यानंतर राहुल देव काही काळ इंडस्ट्रीपासून दूरावला होता.२००९ मध्ये राहुलच्या पत्नीचे निधन झालं.पत्नीच्या निधनानंतर एकल पालक म्हणून मुलाचे संगोपन करण्यासाठी त्याने इंडस्ट्रीतून चार वर्षाहून अधिक काळ ब्रेक घेतला. परंतु, यानंतर पुन्हा इंडस्ट्रीत येण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राहुल रॉयने त्याच्या आयुष्यातील कठीण काळाविषयी खुलासा केला आहे. 'हिंदी रश' ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता म्हणाला, एक पालक म्हणून येणाऱ्या आव्हानांसाठी तो पूर्णपणे तयार नव्हता. "मला पालकत्वाबद्दल अजिबातच माहिती नव्हती. माझ्या पत्नीचे अचानक निधन झाले. मी मुलाचा एकट्याने सांभाळ केला तो टप्पा खूप आव्हानात्मक होता."
राहुल देव या मुलाखतीत म्हणाला," मुंबईत कामावर परतण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागत होता.मात्र, या सगळ्यात त्याला त्याच्या गुरूंची मोठी साथ लाभली. असं त्याने सांगितलं. त्याविषयी बोलताना अभिनेत्याने सांगितलं, माझ्या गुरूंनी मला पुन्हा काम सुरु करण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला मी घाबरले होते. हे सर्व कसे सांभाळायचे हे मला कळत नव्हते. हळूहळू परिस्थिती बदलली. माझा मुलगा मोठा झाला आणि त्याला लंडनमध्ये शिकण्याची संधी मिळाली. तरीही, एकट्याने हे सर्व कसं सांभाळायचं याची मला भीती वाटत होती."
या इंडस्ट्रीने मला...
"जेव्हा मी परत आलो, तेव्हा मला काम मिळालं नाही. मी ८० ते ८१ चित्रपट केले होते. पण साडेचार वर्षे एकटं राहिल्यानंतर, मला असं वाटू लागलं की लोक मला ओळखतच नाहीत. ते मला विसरून गेले होते. मी कोणालाही दोष देत नाही. कारण काळ बदलला आहे, असे अनुभव प्रत्येकाला येत असतात. मी असंही म्हणणार नाही की, इतकं काम करूनही माझ्यासोबतच असं का घडलं? या इंडस्ट्रीने मला खूप काही दिलं आहे. माझ्या परिस्थितीमुळे मी ब्रेक घेतला, हा माझा स्वतःचा निर्णय होता. मला याचा कोणताही पश्चात्ताप नाही."
Web Summary : Rahul Dev took a career break after his wife's death to raise his son. Returning to the industry proved challenging, requiring renewed effort to find work despite past success.
Web Summary : पत्नी की मृत्यु के बाद राहुल देव ने अपने बेटे की परवरिश के लिए ब्रेक लिया। इंडस्ट्री में लौटना चुनौतीपूर्ण साबित हुआ, और पिछली सफलता के बावजूद काम ढूंढने के लिए नए सिरे से प्रयास करने पड़े।