Join us

बॉलिवूडच्या या अभिनेत्याला अ‍ॅक्टिंग आणि सेक्स वाटतं ब्रेड-बटरसारखं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 19:30 IST

या अभिनेत्याने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे.

कार्तिक आर्यनअनन्या पांडे नुकताच प्रदर्शित झालेल्या 'पति पत्नी और वो' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंट दरम्यान कार्तिक व अनन्या यांनी त्यांच्या लव लाईफबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. एका टॉक शोमध्ये कार्तिक आर्यनने सांगितलं की त्याला अभिनय व सेक्स ब्रेड बटर सारखं वाटतं. 

कार्तिकने या शोमध्ये आपल्या आवडत्या व नावडत्या गोष्टींबद्दल देखील सांगितलं. त्याने सेक्स व अभिनयापैकी कोणाला सोडणं सहज शक्य आहे हे सांगितलं. तो म्हणाला की, अभिनय आणि सेक्स ब्रेड व बटरसारखं आहे. तुम्ही दोघांना एकत्र सोडू शकत नाही. अॅक्टिंग व सेक्स किंवा प्रेम माझ्यासाठी एकसमान आहे. 

कार्तिक पुढे म्हणाला की, मला माझ्या खासगी आयुष्याबद्दल जास्त बोलायला आवडत नाही. पण, मला लपवून ठेवायला देखील आवडत नाही. मी कोणत्या रेस्टॉरंटमध्ये डिनरला जाणं बंद करू शकत नाही कारण तिथे फोटोग्राफर्स आहेत.

कार्तिकशिवाय अनन्यानेदेखील तिच्या पर्सनल आयुष्याबद्दल सांगितलं. अनन्या म्हणाली की, फक्त एक व्यक्ती सोडून कोणत्याही एक्स बॉयफ्रेंड माझा मित्र नाही. कारण मला काही प्रश्नांची उत्तर हवी होती.

त्याने मला ब्लॉक केलं त्यामुळे मी आताही त्याच्या उत्तराची वाट पाहत आहे. 

टॅग्स :कार्तिक आर्यनअनन्या पांडे