Emraan Hashmi: बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे इमरान हाश्मी.इमरान हाश्मी हा त्याच्या हटके भूमिकांसाठी आणि उत्तम चित्रपटांच्या निवडीसाठी ओळखला जातो. त्याच्या चित्रपटातील भूमिकांमुळे अभिनेत्याला सिरियल किसर असं म्हटलं गेलं. आशिक बनाया आपने, मर्डर, एक थी डायन तसेच टायगर ४, ग्राउंड झिरो यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर उमटवली. आपल्या दमदार लूक्स आणि अभिनयाने चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्याने वैयक्तिक आयुष्यात बरेच चढ-उतार पाहिले.
नुकत्याच रणवीर अलाबादियाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने आपल्या आयुष्यातील कठीण काळावर भाष्य केलं आहे. ज्यावेळी त्याच्या तीन वर्षांच्या मुलाला कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावेळी त्याची आणि पत्नीची काय अवस्था होती. त्याविषयी इमरानने मुलाखतीमध्ये वक्तव्य केलं आहे.अभिनेता म्हणाला, "माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ तो होत जेव्हा २०१४ मध्ये माझा मुलगा आजारी पडला. मी शब्दांतही सांगू शकत नाही की तो काळ माझ्यासाठी कसा होता. हे ५ वर्षे चालले. एका दिवसांत माझं आयुष्य बदललं.१३ जानेवारीला मी माझ्या कुटुंबासह ताज लँड्समध्ये ब्रंचसाठी गेलो होतो. तेव्हा अयान पिझ्झा खात होता. त्याचवेळी त्याच्यामध्ये पहिल्यांदा कर्करोगाची लक्षणे दिसली."
मग पुढे इमरान म्हणाला, "त्याच्या लघवीमधून रक्त येत होतं. त्यानंतर लगेचच आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. त्यावेळी त्याला मूत्रपिंडाचा कर्करोग असल्याचं निदान झालं. त्यानंतर त्याच्यावर लगेचच उपचार सुरू केले. १२ तासांच्या कालावधीत खूप काही बदलल्या सारखं वाटलं. एका क्षणी, जीवन पूर्णपणे सामान्य वाटलं आणि दुसऱ्या क्षणी सर्वकाही हिरावून गेलं असं वाटत होतं."
यावेळी अभिनेत्याने सांगितले की यानंतर,पाच वर्षांचा प्रवास सुरू झाला जो रुग्णालयात गेला त्यात मुलावर होणारे उपचार आणि मनात सतत भीती असायची. इमरान हाश्मीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या तो ‘तस्करी: द स्मगलर्स वेब’या सीरीजमुळे चांगलाच चर्चेत आहे.
Web Summary : Emraan Hashmi revealed his son's cancer diagnosis in 2014 turned his life upside down. The five-year ordeal involved hospital visits, treatments, and constant fear. He shared his emotional turmoil during the difficult period.
Web Summary : इमरान हाशमी ने बताया 2014 में बेटे को कैंसर होने से उनकी जिंदगी बदल गई। पांच साल अस्पताल के चक्कर, इलाज और डर में बीते। उन्होंने उस मुश्किल दौर में अपनी भावनात्मक पीड़ा साझा की।