बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्र ( Dharmendra ) सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहेत. गतकाळातील अनेक आठवणी, किस्से ते सोशल मीडियावर शेअर करतात. तूर्तास चर्चा आहे ती त्यांच्या एका खास व्हिडीओची. होय, धरमपाजींनी त्यांच्या पहिल्या कारचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ही पहिलीवहिली कार आजही त्यांनी जीवापाड जपून ठेवली आहे.ही कार म्हणजे, काळ्या रंगाची फियाट. आजही ती अगदी नव्या कोऱ्या कारसारखी चमकते. या कारच्या अनेक आठवणी त्यांनी या व्हिडीओत शेअर केल्या आहेत. ‘मित्रांनो, फियाट...माझी पहिली कार, माझं मुलं. ही माझ्या हृदयाच्या जवळ आहे. एका संघर्ष करणा-या तरूणाला परमेश्वराचा आशीर्वाद आहे...,’ या कॅप्शनसह त्यांनी या गाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे
धर्मेन्द्र यांची पहिली कार, अगदी नव्याकोऱ्या कारसारखी...; किंमत पाहून चकित व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 13:45 IST
Dharmendra shares video of his first car : होय, धरमपाजींनी त्यांच्या पहिल्या कारचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ही पहिलीवहिली कार आजही त्यांनी जीवापाड जपून ठेवली आहे.
धर्मेन्द्र यांची पहिली कार, अगदी नव्याकोऱ्या कारसारखी...; किंमत पाहून चकित व्हाल
ठळक मुद्देधर्मेन्द्र लवकरच ‘अपने 2’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत सनी, बॉबी ही त्यांची मुलं आणि नातू करण प्रमुख भूमिका साकारणार आहेत.