Join us

"मला या जगावर ओझं व्हायचं नाहीये, माझं निधन झाल्यास..."; बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं विधान, चाहते भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 09:20 IST

बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं विधान सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याने भावुक खुलासा केल्याने चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि कॉमेडियन गोवर्धन असरानी यांचं २० ऑक्टोबर रोजी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर सांताक्रूझ स्मशानभूमीत खाजगी पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणतीही सार्वजनिक घोषणा न करता असरानी यांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते. यामुळेच असरानी यांचे मित्र आणि अभिनेते अन्नू कपूर भावूक झाले आहेत. त्यांनी त्यांच्या अंत्यंस्काराविषयी मोठं विधान केलंय.

अन्नू कपूर यांनी ANI ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, जेव्हा माझी या 'जगातील हॉटेलमधून चेकआऊट' करण्याची वेळ येईल, तेव्हा माझेही अंतिम संस्कार गुप्तपणे आणि शांततेत पार पडावेत. अन्नू कपूर म्हणाले की, "मी जेव्हा जगाचा निरोप घेईल आणि माझ्या निधनाच्या दिवशी कोणताही राष्ट्रीय सण किंवा मोठा दिवस असेल की, जसं की १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, दिवाळी, होळी, ईद, ख्रिसमस, बुद्ध पौर्णिमा किंवा गुरु पौर्णिमा, तर माझाही अंत्यसंस्कार गुप्तपणे करण्यात यावा."

अन्नू कपूर पुढे म्हणाले, "मला कोणालाही त्रास द्यायचा नाहीये. मला या जगावर ओझं बनून जगायचं नाहीये. मला ते ओझं स्वतःसाठी, माझ्या लोकांसाठी आणि समाजासाठीही नकोय." असरानी यांच्या अंतिम संस्काराचा साधेपणा पाहून अन्नू कपूर यांनीही इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, असरानी यांची इच्छा होती की, साधेपणाने आणि शांतपणाने त्यांना अखेरचा निरोप द्यावा, म्हणूनच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अंत्यसंस्कार पूर्णपणे खाजगी ठेवले.

English
हिंदी सारांश
Web Title : Annu Kapoor wants a private funeral, no burden to anyone.

Web Summary : Actor Annu Kapoor, moved by Govardhan Asrani's private funeral, desires a similar quiet farewell. He wishes to avoid burdening anyone, especially on national holidays, preferring a discreet cremation.
टॅग्स :अन्नू कपूरमृत्यूबॉलिवूड