बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन ८३ वर्षांचे झाले आहेत, पण या वयातही त्यांची ऊर्जा तरुणांना लाजवेल अशी आहे. 'कौन बनेगा करोडपती'चं शूटिंग आणि सोशल मीडिया अशा सर्वच आघाड्यांवर बिग बी सक्रिय असतात. बिग बी नेहमीच ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असतात. नुकत्याच लिहिलेल्या एका ब्लॉगमध्ये त्यांनी कामाचा ताण आणि झोपेच्या समस्येचा उपाय याबद्दल भाष्य केले आहे.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, "आजकाल सकाळी झोप पूर्ण झाली असं वाटतच नाही, कारण माझ्यासाठी कामाचे महत्त्व झोपेपेक्षा जास्त झाले आहे." डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरीराला विश्रांती हवी म्हणून किमान ७ तासांच्या झोपेची गरज असते, हे मान्य असूनही कामाच्या व्यापापुढे त्यांना झोपेशी तडजोड करावी लागते.
जेव्हा झोप येत नाही किंवा मन अस्वस्थ असते, तेव्हा बिग बी संगीताचा आधार घेतात. त्यांनी लिहिले, "मध्यरात्रीच्या शांततेत गिटार आणि सतारवर वाजणारे भावपूर्ण शास्त्रीय संगीत मला सुखद अनुभव देते. त्यामुळे शांत झोप लागण्यासाठी यापेक्षा चांगला तसा दुसरा कोणताही इलाज नाही. हे संगीत मनाला शांत करते." त्यांच्या मते, संगीत केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते ईश्वराशी जोडण्याचे एक माध्यम आहे.
अमिताभ बच्चन म्हणतात की, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील संगीत असो, ते सात सुरांवरच आधारलेले असते आणि हे सात सूर मानवतेची ओळख आहेत. झोप येत नसेल तर हळूवार संगीत लावा, ते तुम्हाला हळूहळू शांत करेल आणि आपोआप झोप येईल, असा सल्लाही त्यांनी चाहत्यांना दिला आहे.
शिस्त आणि मेहनतीचे उत्तम उदाहरण
८३ वर्षांचे असूनही अमिताभ बच्चन अत्यंत शिस्तबद्ध आयुष्य जगतात. 'केबीसी'च्या शूटिंगव्यतिरिक्त ते जाहिरातीमध्येही काम करतात आणि नियमितपणे ब्लॉग लिहिण्यातही व्यस्त असतात. बिग बींनी अनेक चित्रपटांसाठी स्वतःची गाणीही गायली आहेत. नवीन पिढीसाठी बिग बी आजही मेहनत आणि समर्पणाचे एक आदर्श उदाहरण आहेत.
Web Summary : Struggling with sleeplessness? Amitabh Bachchan, despite his busy schedule, suggests listening to soothing classical music. He finds it calming, offering a peaceful way to unwind and drift off to sleep, even at 83.
Web Summary : नींद से परेशान हैं? अमिताभ बच्चन, व्यस्त कार्यक्रम के बावजूद, सुखदायक शास्त्रीय संगीत सुनने का सुझाव देते हैं। उन्हें यह शांत करने वाला लगता है, आराम करने और सोने के लिए एक शांतिपूर्ण तरीका है, भले ही 83 वर्ष की उम्र में।