Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉबी देओल आणि त्याच्या पत्नीची कमाल! एकाच वेळी मुंबईत ५ ऑफिस केले खरेदी, 'इतक्या' कोटींचा व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 15:40 IST

बॉबी देओल यावेळी कुठल्या सिनेमामुळे चर्चेत आलेला नाही. तर त्याने पत्नीसोबत मिळून मुंबईत एकाच वेळी तब्बल ५ ऑफिस खरेदी केले आहेत.

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता बॉबी देओल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण बॉबी देओल यावेळी कुठल्या सिनेमामुळे चर्चेत आलेला नाही. तर त्याने पत्नीसोबत मिळून मुंबईत एकाच वेळी तब्बल ५ ऑफिस खरेदी केले आहेत. बॉबी देओल आणि तान्याची कंपनी ग्रीन स्टोन इन्वेस्टमेंट प्रायवेट लिमिटेड तर्फे मुंबईत या ५ ऑफिसची खरेदी करण्यात आली आहे. हे युनिट्स ३४०० स्क्वेअर फिट परिसरात पसरल्याची माहिती आहे. ज्याची किंमत तब्बल १५ कोटी इतकी आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, फेब्रुवारी महिन्यात बॉबी देओल आणि तान्याने यासाठी रजिस्ट्रेशन केलं आहे. यासाठी १.५० लाख रुपये रजिस्ट्रेशन फी त्यांना द्यावी लागली आहे. तर या व्यवहारात ९० लाख इतकी स्टँप ड्युटी त्यांनी भरली आहे. या पाच ऑफिससोबतच पाच कार पार्किंगही खरेदी करण्यात आल्या आहेत. अंधेरीमधील युरा बिजनेस पार्क फेज २ मधील एका बिल्डिंगमध्ये हे ऑफिस बॉबी देओल आणि त्याच्या पत्नीने खरेदी केले आहेत. या बिल्डिंगचं काम सध्या सुरू आहे. याच बिल्डिंगमध्ये हृतिक रोशननेही ऑफिस घेतलं आहे. 

दरम्यान, बॉबी देओल 'बंदर' या अनुराग कश्यपच्या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा २२ मे २०२६ रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. याशिवाय डाकू महाराज या तेलुगु सिनेमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'अल्फा', 'अपने २' या बॉबी देओलच्या सिनेमांच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. 

टॅग्स :बॉबी देओलसेलिब्रिटी