Join us  

Rishabh Pantला शुभेच्छा देऊन Urvashi Rautela झाली ट्रोल, युझर्स म्हणाले, त्याच्यापासून दूर राहा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 1:57 PM

Bollywood, Cricket News: Urvashi Rautelaने भारताचा यष्टीरक्षक आणि आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार Rishabh Pantला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ट्विट केले होते. त्यानंतर सोशल मीडिया युझर्सनी तिला ट्रोल करून हैराण केले.

मुंबई - बॉलिवूज अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्वशीच्या लुक्स आउटफिट्सची चर्चा बॉलिवूडमध्ये होत असते. त्याबरोबरच तिचे ट्विट्ससुद्धा लक्षवेधी असतात. त्यामुळे सोशल मीडिया युझर्स तिच्या ट्विट्समधून ट्विस्ट शोधून काढतात. दरम्यान, भारताचा यष्टिरक्षक आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतसाठी केलेल्या एका ट्विटमुळे ती ट्रोल झाली आहे. (Birthday wish to Rishabh Pant, Urvashi Rautela became a troll, users said, stay away from him)

सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह असणाऱ्या उर्वशी रौतेलाला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. हल्लीच उर्वशीने भारताचा यष्टीरक्षक आणि आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ट्विट केले होते. त्यानंतर सोशल मीडिया युझर्सनी तिला ट्रोल करून हैराण केले.

रिषभ पंतने नुकताच त्याचा २४ वा वाढदिवस साजरा केला. या खास क्षणी उर्वशीने ट्विट करून त्याला बर्थडे विश केले. त्याने रिषभ पंतला टॅग करत लिहिले की, हॅपी बर्थडे. या ट्विटनंतर युझर्सनी तिची खूप खिल्ली उडवली. काही जणांनी सांगितले की, आम्हाला माफ कर, तर काही जणांनी लिहिले की, राहू दे. 

काही वर्षांपूर्वी रिषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यात अफेअर असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर हे दोघेही वेगळे झाले होते. काही रिपोर्ट्सनुसार रिषभने उर्वशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केले होते. रिषभ आणि उर्वषीच्या भूतकाळाचा विचार करूनच युझर्स तिला रिषभपासून दूर राहण्याचा सल्ला देत आहेत. 

टॅग्स :उर्वशी रौतेलारिषभ पंतबॉलिवूडआयपीएल २०२३