Join us

Birthday special: यामीचे होते ‘हे’ स्वप्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2016 13:10 IST

अभिनेत्री यामी गौतम हिचा आज (२८ नोव्हेंबर) वाढदिवस. वाढदिवसानिमित्त तिच्याविषयी जाणून घेऊ यात काही खास गोष्टी...आज बॉलिवूडमधल्या काही ...

अभिनेत्री यामी गौतम हिचा आज (२८ नोव्हेंबर) वाढदिवस. वाढदिवसानिमित्त तिच्याविषयी जाणून घेऊ यात काही खास गोष्टी...आज बॉलिवूडमधल्या काही नावाजलेल्या अभिनेत्रींमध्ये यामी गौतम हिची गणना होते. हीच यामी कधीकाळी आयएएस अधिकारी बनू इच्छित होती. शालेय शिक्षणानंतर यामीने बीए केले. यानंतर युपीएससीची तयारी करून तिला आयएएस अधिकारी बनायचे होते. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याआधी यामी लॉ आॅनर्सचे शिक्षण घेत होती. पण बॉलिवूड करिअरसाठी शिक्षण अर्धवट टाकून तिने मायानगरीची वाट धरली.मुंबईत आली तेव्हा यामी केवळ २० वर्षांची होती. ‘चांद के पार चलो’ या शोमधून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. ‘उलासा उत्सना’ हा यामीचा पहिला कन्नड चित्रपट.यामी केवळ बॉलिवूडच नव्हे तर पंजाबी, तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड अशा विविध भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे.यामीचे वडील मुकेश गौतम पंजाबी चित्रपटांचे दिग्दर्शक आणि पीटीसी पंजाबी नेटवर्कचे उपाध्यक्ष आहेत. ‘एक नूर’ आणि ‘अखियां उडीकदियां’ या चित्रपटांसाठी मुकेश ओळखले जातात.यामीची एक बहीणही आहे. सुरीली गौतम असे तिचे नाव. सुरिली सुद्धा बॉलिवूडमध्ये करिअर बनवू इच्छिते. पंजाबी चित्रपट ‘पावर कट’मधील सुरीलीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.