प्रसिद्ध बॉलीवूड कोरिओग्राफर (नृत्य दिग्दर्शक) सरोज खान यांचा आज वाढदिवस. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांच्या तालावर नाचणे म्हणजे भाग्य मानणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये माधूरी, श्रीदेवी, ऐश्वर्या यासारख्या मोठमोठ्या नावांचा सामावेश होतो. अर्थपूर्ण, दिलखेचक स्टेप्स आणि नृत्याविष्काराचा आदर्श असेच त्यांच्या कोरिओग्राफीचे वर्णन करावे लागेल.नव्वदच्या दशकात प्रत्येक दिग्दर्शकाची पहिली पसंत असणाऱ्या सरोज खान यांनी वयाच्या १४व्या वर्षापासूनच गाण्यांवर स्टेप्स बसवणे सुरू केले होते. त्यांचे खरे नाव निर्मला किशनचंद साधू सिंग नागपाल असे असून २२ नोव्हेंबर १९४८ रोजी त्यांचा जन्म झाला होता.त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या देदिप्यमान करिअरमधील काही आयकॉनिक गाणी पाहुयात...
* धक धक करने लगा या गाण्याविषयी अधिक काही सांगण्याची गरज नाही. हँड्स डाऊन टू माधूरी आणि सरोज खान! ‘बेटा’ चित्रपटातील या गाण्याने लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडीत काढलेले आहेत. अनिल कपूर आणि माधुरीची केमिस्ट्री म्हणजे ए-वन.
* काटे नहीं कटते : ‘मि. इंडिया’ चित्रपटातील या गाण्यातील श्रीदेवी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. निळ्या साडीमधील तिचे मादक नृत्य हिंदी सिनेमातील सर्वोत्तम मानले जाते. याचे श्रेय जाते ते सरोज खान यांना.
* एक - दोन - तीन ‘तेजाब’ चित्रपटातील हे गाणे माहित नसणार व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. माधूरीला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवणाऱ्या या गाण्याच्या स्टेप्स सरोज खान यांच्या क्रिएटिव्ह डोक्यातून निर्माण झालेल्या आहेत. पुढे ‘डान्सिंग क्वीन’ म्हणून माधुरी ओखळली जाऊ लागली ती याच गाण्यामुळे.
* ना जाने कहां से आएगी श्रीदेवीवर चित्रित झालेल्या या गाण्यासाठी सरोज यांना बेस्ट कोरिओग्राफीचा लागोपाठ दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. ‘चाल बाज’ चित्रपटातील हे रेन डान्स साँग आजही आवडीने ऐकले जाते.
* चोली के पिछे क्या है ‘खलनायक’ चित्रपटातील हे गाणे म्हणजे बॉलीवूडमधील ‘टाईमलेस’ गाण्यांपैकी एक आहे. ओठांवर खिळणारी चाल व शब्दांबरोबरच सरोज यांच्या स्टेप्सवर थिरकलेल्या माधूरीमुळे हे गाणे आयकॉनिक बनले.
* डोला रे डोला माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांचे ‘नृत्य द्वंद’ म्हणजे डान्सप्रेमींसाठी पर्वणीच. भंसाळीच्या ‘देवदास’ला ‘यादगार‘ बनवण्यामध्ये सरोज खान यांच्या या गाण्याचा खूप मोठा हात आहे. चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर गाणे म्हणूनही ‘डोला रे डोला’ मानले जाते.
* ये इश्क हाए ‘जब वुई मेट’मधील या गाण्यात करिना कपूर ज्या प्रकारे नाचली आहे ते पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल. या हॅपी गाण्याला खऱ्या अर्थाने जिवंतपणा आणला आहे तो सरोज यांच्या स्टेप्समुळे.
व्हिडिओ सौजन्य : यूट्यूब, बॉलीवूड क्लासिक्स, अल्ट्रा हिंदी, एरॉस नाऊ, टी सीरिज