बॉलिवूड अनिनेत्री पूजा भट्ट हिचा आज वाढदिवस. आज ती 49 वर्षांची झाली. पूजा भट्ट चित्रपटांपेक्षा तिच्या पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत राहिली. बॉलिवू़डमध्ये एंट्री घेतल्या घेतल्या तिचे नाव तिच्या अनेक को- स्टार बरोबर जोडण्यात आले होते. पूजा ज्याही चित्रपटात काम करायची तिच्या अफेअरची व्हायची.‘दिल है कि मानता नहीं’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिचे नाव आमिर खानसोबत जोडण्यात आले. यानंतर नाव बॉबी देओलसोबत तिचे नाव जोडले आणि यानंतर काही दिवसांनी रणवीर शौरीसोबत देखील तिच्या अफेअरची चर्चा रंगली.
अफेअरच्या चर्चा सुरु असतानाच पूजाने 2003 मध्ये अचानक मनीषा मखीजासोबत लग्न केले आणि सगळ्यांचा धक्का दिला. मनीषचे दूर-दूरपर्यंत बॉलिवूडशी संबंध नव्हता तो टीव्हीवर अँकरिंग करायचा. मनीष आणि पूजाची ओळख ‘पाप’ फिल्मच्या सेटवर झाली. या चित्रपटातून पूजाने बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते.
काहींच्या मते, दोघांच्या लाईफ स्टाईलमध्ये खूप अंतर होते. एकमेकांशी तडजोड करू न शकल्यामुळे दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. काहींच्या मते, दोघांच्या घटस्फोटाला रणवीर शौरी जबाबदार होता. कारण रणवीर पूजाचा पहिला क्रश होता. लग्नानंतरही पूजा रणवीरला विसरु शकली नव्हती.
2003मध्ये पूजाने ‘जिस्म’ चित्रपट तयार केला. त्यावेळी रणवीरचा यात छोटासा रोल होता. इथूनच दोघांच्या भेटीचा सिलसिला सुरु झाला. रणवीरला नशा करण्याची सवय होती. यामुळे तो अनेक वेळाला पूजावर हात उचलायचा. ही गोष्ट एकदिवशी पूजाच्या भावाला कळली आणि त्यांने रणवीरची धुल्लाई केली. यानंतर रणवीरने नेहमीसाठीच पूजासोबतचे नातं तोडून टाकले.
पूजाला 16 वर्षांच्या वयातच दारूचे व्यसन लागले होते. हळूहळू हे व्यसन प्रचंड वाढले होते. अनेक वर्षे दारूच्या नशेत बर्बाद करणा-या पूजाला वयाच्या 45 व्या वर्षी दारू आपल्याला उद्ध्वस्त करत असल्याचा साक्षात्कार झाला आणि यानंतर तिने दारू सोडण्याचा निर्णय घेतला.