जॉनची आई फिरोजा इराणी पारसी आहे. त्यामुळे जॉनचे पारसी नाव फरहान आहे. मात्र जॉनचे वडिल ख्रिश्चन आहेत. त्यामुळे त्याचे नाव जॉनही आहे. जॉनला एक बहिण आणि एक लहान भाऊ आहेत.
१९९९ मध्ये जॉनने ग्लॅडरग्स मॅनहंट कॉन्टेस्ट जिंकले. यानंतर जॉन मॅनहंट इंटरनॅशलमध्ये सहभागी झाला. येथे तो सेकंड रनरअप राहिला. यापश्चात जॉनने हाँगकाँग, लंडन, न्यूयॉर्कमध्ये मॉडेलिंग केले.
भारतात सर्वात आधी जॉन अनेक जाहिरातींमध्ये दिसला. या जाहिरातींनी जॉनला एका म्युझिक अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळवून दिली. पुढे याचमार्गाने जॉन बॉलिवूडमध्ये दाखल झाला.
२००३ मध्ये ‘जिस्म’ या चित्रपटातून जॉनने बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटासाठी त्याला बेस्ट डेब्यू मेलचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. यानंतर ‘धूम’, ्न‘वॉटर’, ‘बाबुल’, ‘गरम मसाला’, ‘टॅक्सी नंबर ९२११’, ‘रेस २’, ‘ढिशूम’,‘वेलकम बॅक’, ‘फोर्स२’असे अनेक हिट चित्रपट त्याने दिलेत. या यशानंतर त्याने निर्मितीमध्येही हात आजमावला. २०१२ मध्ये जॉनने ‘विक्की डोनर’ हा चित्रपट प्रोड्यूस केला होता. यानंतर ‘मद्रास कॅफे’ हा चित्रपटही त्याची निर्मिती होती.
एकदा जॉन विवादात सापडला होता. ‘झूठा ही सही’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका सिंगींग रिअॅलिटी शोमध्ये त्याने वाद ओढवून घेतला होता. याठिकाणी जॉनला कॉमेडियन सुगंधा मिश्रा हिचा परफॉर्मन्स इतका आवडला होता की त्याने तिला सगळ्यांसमोर किस केले होते. जॉनचे हे वागणे सुगंधाला अजिबात आवडले नव्हते.
चित्रपटांशिवाय आपल्या अफेअरमुळेही जॉन चर्चेत राहिलाय. जॉन व बिपाशा बसू दोघेही दहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचीही केमिस्ट्री लोकांना आवडायची. २००३ मध्ये ‘जिस्म’च्या सेटवर दोघांमध्ये प्रेम फुलले होते. या दोघांनाही बॉलिवूडचे आयडियल कपल मानले जायचे. पण का कुणास ठाऊक, दहा वर्षांच्या दीर्घ रिलेशनशिपनंतरही अचानक या दोघांच्या बे्रकअपची बातमी आली.
जॉन आणि रिया सेन यांच्या अफेअरच्या बातम्याही गाजल्या. जॉन रियावर खूप प्रेम करायचा आणि तिच्यासोबत लग्न करण्याचीही त्याची इच्छा होती. पण रियाने बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी जॉनचा लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला होता.
ALSO READ : जेव्हा बिपाशा बसूने सर्वांसमोर जॉन अब्राहमला केली होती शिवीगाळ!
२०१४ मध्ये जॉनने एनआरआय इव्हेंस्टमेंट बँकर प्रिया रूचाल हिच्याशी लग्न केले. अधूनमधून जॉन व प्रिया यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या येतात. पण यानंतर हे कपल एकत्र दिसते आणि सगळ्या चर्चा अफवा सिद्ध होतात.