Join us  

Birthday Special : नंदिता दासबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2017 7:12 AM

अभिनेत्री नंदिता दास आज आपला 48वा वाढदिवस साजरा करते आहे. नंदिता तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. नंदिताने वेगळ्या थाटणीचे अनेक ...

अभिनेत्री नंदिता दास आज आपला 48वा वाढदिवस साजरा करते आहे. नंदिता तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. नंदिताने वेगळ्या थाटणीचे अनेक चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. नंदिताने कमी चित्रपटात काम केले आहे मात्र ज्या भूमिका तिने साकारल्या त्या वादात जास्त अडकल्या. एक किसिंग सीनमुळे ती चर्चेत आली. फायर चित्रपटात दिलेल्या किसिंग सीनमुळे ती चर्चेत आली होती. या चित्रपटात तिने शबाना आझमींसोबत एक लिप-लॉप सिन दिला होता. ज्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली होती. अभिनयासोबत तिने चित्रपट दिग्दर्शित देखील केले आहेत. नंदिता फायर आणि बवंडर चित्रपटांमुळे जास्त चर्चेत आली. नंदिताने आमिर खानचा चित्रपट अर्थ 1947मध्ये अनेक बोल्ड आणि हॉट सीन दिले होते. काही छोट्या चित्रपटांसाठी तिने लेखनसुद्धा केले आहे. समीक्षकांकडून कौतुक केलेल्या चित्रपटांचा भाग ती होती. तिने काही हॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.  नंदिताने फिरकी चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केले. तिच्या या चित्रपटाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अॅवॉर्ड जिंकले होते. हा पहिला असा भारतीय चित्रपट आहे ज्याला इंटरनॅशनल वुमेन्स फोरममध्ये सहभागी करण्यात आले होते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल आमिर खानच्या लगान चित्रपटातील लीड रोलसाठी आधी नंदिताची निवड करण्यात आली होती. मात्र त्यानंतर ग्रेसी सिंगचे नाव फायनल करण्यात आले. राकेश ओमप्रकाश मेहरानी सुद्धा अक्स चित्रपट तिची निवड केली होती मात्र नंतर नंदितानेच हि भूमिका साकारण्यास नकार दिला. हे नंदिताचे दुसरे लग्न आहे. २००२ मध्ये नंदिताने सौमाया सेनसोबत विवाहबद्ध झाली होती. २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर २०१० मध्ये नंदिताने सुबोध मस्कारासोबत लग्न केले होते. मात्र या वर्षीचा सुरुवातीला त्यांचा घटस्फोट झाला.  या दोघांना एक सहा वर्षाचा मुलगा विहान आहे.सुबोध आणि नंदिता यांनी ‘बिटवीन द लाइन्स’ नावाच्या नाटकात २०१२ मध्ये एकत्र काम केले होते.