आज बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पादुकोणचा बर्थ डे आहे.. लग्नानंतर दीपिकाचा हा पहिला वाढदिवस आहे. रिपोर्ट्नुसार दीपिका आपला पहिला वाढदिवस सासरी सेलिब्रेट करणार आहे. दीपवीरच्या फॅन्सना अपेक्षा आहे की रणवीर सिंग दीपिकाचा पहिला बर्थ डे स्पेशल पद्धतीने सेलिब्रेट करेल.
दीपिकाच्या कामाबाबत बोलायचे झाले तर लग्नानंतर ती मेघना गुलजारच्या 'छपाक' सिनेमात दिसणार आहे. 'छपाक’मध्ये दीपिकाच्या अपोझिट विक्रांत मेस्सीची वर्णी लागल्याचे कळतेय.या सिनेमात दीपिका अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिचा जीवनसंघर्ष पडद्यावर दाखवणार आहे.
दीपिकाने मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘ओम शांती ओम’ या पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटासाठी तिला ‘बेस्ट फिमेल डेब्यू’ या कॅटेगरीत फिल्मफेअर अवार्ड मिळाला. यानंतर मात्र दीपिकाने कधीच मागे वळून पाहिले नाही. गत १४ व १५ नोव्हेंबरला दीपिकाने अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधली. इटलीच्या सुप्रसिद्ध लेक कोमो येथे दोघांचेही लग्न झाले. सध्या दीपिका आणि रणवीर दोघे सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. त्यामुळे दीपिकाचा हा बर्थ डे स्पेशल असेल यात काहीच शंका नाही.