Join us

अन् भरपार्टीत या सुपरस्टारने अमृता सिंगला केले होते बळजबरीने किस, थक्क करणारा किस्सा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 08:00 IST

एकेकाळी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने बॉलिवूडप्रेमींना वेड लावणा-या अमृता सिंगचा आज वाढदिवस.

ठळक मुद्देअसे म्हणतात की, 90 च्या दशकात अमिताभ यांना अमृतावर जबरदस्त क्रश होता.

एकेकाळी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने बॉलिवूडप्रेमींना वेड लावणा-या अमृता सिंगचा आज वाढदिवस. 90 च्या दशकात तिचा निर्भीड आणि बोल्ड अंदाज सगळ्यांनाच भावला. ‘बेताब’ या सिनेमातून पदार्पण करणा-या अमृताने यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. याच अमृतावर 16 व्या वर्षी एका पार्टीतअसा काही प्रसंग ओढवला होता की, सगळेच पाहून थक्क झाले होते.

होय, पार्टी रंगात आली होती. या पार्टीत डॅनी होता, अमृता होती, अमिताभ बच्चन होते. अशात अचानक असे काही झाले की, अमिताभ बच्चन यांचा स्वत:वरचा ताबा सुटला आणि त्यांनी अमृताला जोरात आपल्याकडे ओढत तिला किस केले.  

1991 मध्ये स्टार अ‍ॅण्ड स्टाईल मॅगझिनमध्ये हा किस्सा छापून आला होता. पुढे India-forums.com वर कुणीतरी हे आर्टिकल शेअर केले होते. या आर्टिकलमधील अमिताभ व अमृताबद्दलचा किस्सा वाचून लोक अवाक् झाले होते.

या लेखात म्हटल्याप्रमाणे,पियानो बारमध्ये पार्टी सुरु होती. अमृताही या पार्टीत काही मित्रांसोबत आली. अमिताभ, डॅनीही पार्टीला हजर होते. काही वेळानंतर अमृता पार्टीतून जायला लागली. अचानक डॅनीने तिला आणखी काही वेळ थांबण्याची गळ घातली. अमृता थांबली आणि डॅनीने तिला आपल्यासोबत डान्स करण्यास म्हटले. दोघेही डान्स करू लागले. सोबत डॅनीचे फ्लर्टही सुरु होते.

अमिताभ यांना हे आवडले नाही. त्यांनी डॅनीला अमृतापासून दूर केले आणि स्वत: अमृताजवळ जात तिच्या ओठांवर किस केले. हे पाहून सगळेच थक्क झालेत. अमृता तर जागच्या जागी थिजली. यानंतर ती बाथरूमकडे धावली. अमिताभही अमृताच्या मागे गेलेत. सगळे थक्क होऊन सगळे बघत होते. अमृता पार्टी सोडून निघून गेली. पुढे अमिताभ यांनी आपल्या या कृत्यासाठी अमृताची माफीही मागितली होती.

असे म्हणतात की, 90 च्या दशकात अमिताभ यांना अमृतावर जबरदस्त क्रश होता. अमृता व विनोद खन्ना यांच्या ब्रेकअपचे कारणही अमिताभ होते.

टॅग्स :अमृता सिंगअमिताभ बच्चन