काही दिवसांपूर्वीच बिपाशा पती करण सिंग ग्रोवर याच्यासोबत मुंबईतील हिन्दूजा रुग्णालयाच्या बाहेर बघावयास मिळाली होती. त्यानंतरच ती गर्भवती असल्याची चर्चा रंगली. मात्र या चर्चांचे बिपाशाने खंडन केल्याने, या फोटोबद्दल शंका घेतली जात आहे. बिपाशाने नुकतेच तिच्या एका मुलाखतीत म्हटले की, मी प्रेग्नेंट नाही. कृपया करून अशाप्रकारचे अंदाज लावू नका. आमचे असे कुठलेही प्लॅनिंग नाही. माध्यमांना मी विनंती करते की, त्यांनी अशाप्रकारच्या बातम्या देऊ नये. दरम्यान, बिपाशाने ३० एप्रिल २०१६ रोजी करण सिंग ग्रोवर याच्याशी लग्न केले.
दरम्यान, एका रिपोर्ट्मध्ये दावा करण्यात आला होता की, करणची आई दीपा सिंग यांना बिपाशा पसंत नव्हती. त्यावेळी त्यांनी तिला नकारही दिला होता. नकाराचे कारण बिपाशाचा भूतकाळ असल्याचे समजते. कारण करणच्या अगोदर बिपाशाच्या आयुष्यात डिनो मोरिया, जॉन अब्राहम, हरमन बावेजा, राणा दग्गुबत्ती या अभिनेत्यांची नावे जोडली आहेत. यांच्यासोबत बिपाशाचे नाते अयशस्वी राहिल्यामुळे करणचाही बिपाशा अर्ध्यातच साथ सोडून देईल अशी शंका करणच्या आईला येत होती.