Join us

​करणसोबत हॉस्पीटलमध्ये पोहोचली बिपाशा बासू; ‘गुड न्यूज’ तर नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 12:20 IST

बॉलिवूडची ‘बंगाली बाला’ बिपाशा बासू दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. २०१५ मध्ये ‘अलोन’ या चित्रपटाच्या सेटवर ती अखेरची दिसली होती. ...

बॉलिवूडची ‘बंगाली बाला’ बिपाशा बासू दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. २०१५ मध्ये ‘अलोन’ या चित्रपटाच्या सेटवर ती अखेरची दिसली होती. साहजिक बिपाशाचे चाहते तिला मिस करताहेत. कदाचित त्याचमुळे बिपाशा घराबाहेर पडली रे पडली की त्याची बातमी होते. काल-परवा बिपाशा अशीच घराबाहेर पडली. तिच्यासोबत तिचा लाडका हबी करण सिंग ग्रोव्हर हाही होता.दोघांचीही कार एका हॉस्पीटलजवळ थांबली आणि सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या. लगेच बिपाशाकडे गुड न्यूज तर नाही ना? याची चर्चा  सुरू झाली.हॉस्पीटलबाहेर बिपाशा व करणला कॅमेºयात कैद करण्यासाठी फोटोग्राफर्सची एकच झुंबड उडाली. काही वेळाने बिपाशा व करणच्या हॉस्पीटलमध्ये येण्याचे कारण समोर आले. करणच्या पोटात इंफेक्शन झाल्याने हे कपल डॉक्टरकडे आले होते ,असे नंतर कळले.अर्थात तरीही बिपाशाकडे ‘गुड न्यूज’ तर नाही ना, ही चर्चा थांबली नाही. बॉलिवूडच्या यापूर्वीच्या अनेक अभिनेत्रींबाबतचा अनुभव लक्षात घेता, खरे काय नि खोटे काय, शेवटपर्यंत हेच कळत नाही. त्यामुळेच अशा चर्चा होतात. करिना प्रेग्नंट असताना सुरूवातीला तिने स्वत:ची प्रेग्नंसी लपवली होती. असे काही नाही, असे ती आत्मविश्वासाने मीडियाला सांगत होती. पण पुढे काय झाले ते सगळ्यांच ठाऊक आहे. अलीकडचे ताजे उदाहरण घ्यायचे तर विराट कोहली व अनुष्का शर्माच्या लग्नाचे घेता येईल. तिकडे  विराट व अनुष्का आपल्या लग्नासाठी इटलीसाठी रवाना झाले होते अन् इकडे अनुष्काचा प्रवक्ता लग्नाची बातमी निव्वळ अफवा आहे,असे सांगत होता. त्यामुळे बिपाशाकडे गुड न्यूज आहे की नाही, याची चर्चा होणारच.ALSO READ : ​फॅशनच्या नावावर जीन्सच्या झाल्या चिंध्या! बिपाशा बासूचा चढला पारा!!‘अलोन’ या सिनेमाच्या सेटवरच बॉलिवूडची ‘डस्की ब्युटी’ बिपाशाची करणसोबत ओळख झाली होती. पुढे मैत्रीपासून सुरु झालेला हा प्रवास  प्रेमात कधी रुपांतरित झाला हे या दोघांनाही कळले नाही. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात बिपाशाने करणसोबत लग्न केले होते.