Join us

‘बिग बॉस’ मध्ये ‘दंगल’ चे प्रमोशन नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 18:47 IST

एखादा चित्रपट प्रदर्शित होणार असेल आणि ‘बिग बॉस’ मध्ये त्याचे प्रमोशन झाले नाही, असे कधीच होत नाही. ‘बिग बॉस’ ...

एखादा चित्रपट प्रदर्शित होणार असेल आणि ‘बिग बॉस’ मध्ये त्याचे प्रमोशन झाले नाही, असे कधीच होत नाही. ‘बिग बॉस’ हा रिअ‍ॅलिटी शो टीव्ही जगतातील सर्वांत जास्त टीआरपीचा शो मानला जातो. हे माहिती असून देखील आमिर खानला सुपरस्टार सलमान खानच्या ‘बिग बॉस’ च्या शोवर ‘दंगल’चे प्रमोशन करावयाचे नाहीये. आमिर-सलमान हे चांगले मित्र-सहकारी असले तरीही नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ चित्रपटाचे प्रमोशन बिग बॉसवर होणार नसल्याचे सुत्रांकडून कळतेय.आमिर खान याविषयी अधिक माहिती देताना म्हणाला,‘मी टीव्हीवर चित्रपटाचे प्रमोशन करणार नाहीये. आम्ही ट्रेलर आणि प्रोमो टीव्हीवर लाँच करू. सलमानला माझ्या चित्रपटाचे प्रमोशन करायला नक्कीच आवडेल. याउलट मी देखील त्याला ‘दंगल’ दाखवण्यासाठी उत्सुक आहे. पण, ‘बिग बॉस’च्या माध्यमातून मी चित्रपटाचे प्रमोशन करणार नाही.’सुपरस्टार सलमान खान यानेही ‘सुल्तान’ मध्ये हरयाणवी पहेलवानाची भूमिका केली होती. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ‘दंगल’ हा चित्रपट ‘सुल्तान’ पेक्षा सरस ठरणार का? हे आता वेळच सांगू शकेल. हरयाणाचा पहेलवान महावीर सिंग फोगट याच्या आयुष्यावर आधारित ‘दंगल’ चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. महावीर फोगटच्या दोन मुली गीता आणि बबिता फोगट यांनी भारताला २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला पहेलवान गटात पहिले पारितोषिक मिळवून दिले होते.