Join us  

Bigg Boss15:१४ आठवड्यांसाठी सलमानने घेतलं इतकं मानधन; आकडा ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 11:34 AM

Bigg Boss 15: या पर्वात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांपासून ते अभिनेता सलमान खानने घेतलेल्या मानधनापर्यंत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

ठळक मुद्देसलमानने थोडंथोडकं नव्हे तर चक्क ३५० कोटी रुपये फी घेतल्याचं म्हटलं जात आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत राहणारा शो म्हणजे बिग बॉस. अलिकडेच या शोचं पहिलं 'बिग बॉस ओटीटी' हे पर्व पार पडलं. त्यानंतर आता खऱ्या अर्थाने टेलिव्हिजनवर 'बिग बॉस १५' चं नवं पर्व गाजणार आहे. त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर या शोविषयी अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या पर्वात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांपासून ते अभिनेता सलमान खानने घेतलेल्या मानधनापर्यंत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्यातच आता अभिनेता आणि बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खान याचं मानधन समोर आलं आहे. विशेष म्हणजे यंदाच्या पर्वासाठी सलमानने भलंमोठं मानधन घेतल्याचं सांगण्यात येत आहे. 

गेल्या १० वर्षांपासून बिग बॉसचं सूत्रसंचालन करणारा सलमान खान यावेळीदेखील बिग बॉस १५ चं सूत्रसंचालन करणार आहे. त्यामुळे यावेळी सलमान किती फी घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण, आता सलमानचं मानधन समोर आलं आहे.

रवी जाधवच्या पत्नीपुढे अभिनेत्रीही फेल; पाहा मेघना जाधवचे झक्कास फोटो

सूत्रांच्या माहितीनुसार, सलमानने थोडंथोडकं नव्हे तर चक्क  ३५० कोटी रुपये फी घेतली आहे. विशेष म्हणजे ही फी केवळ १४ आठवड्यांसाठीच आहे. सलमानने या मानधनाविषयी अद्यापही मौन बाळगलं आहे. मात्र, तरीदेखील सोशल मीडियावर त्याच्या मानधनाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

LetsOTT GLOBAL या ट्विटर हॅण्डलवर सलमानच्या मानधनाची माहिती देण्यात आली आहे. "LetsOTT Exclusive: #SalmanKhan will be paid a huge remuneration for Bigg Boss 15 - ₹350 crores for 14 weeks", असं शेअर केलेल्या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, बिग बॉस १५ मध्ये यंदा कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्यातच या शोमध्ये टीना दत्ता (Tina Datta), मानव गोहिल (Manav Gohil), करन कुंद्रा (Karan Kundra), अफसाना खान (Afsana Khan), सिंबा नागपाल (Simba Nagpal), रीम शेख (Reem Shaikh) आणि अमित टंडन (Amit Tandon) या कलाकारांच्या नावाची चर्चा सुरु आहे. 

टॅग्स :बिग बॉससलमान खानटिव्ही कलाकार