Join us
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' अॅम्ब्युलन्समुळे वाचले बिग बी अमिताभ बच्चन यांचे प्राण, बाळासाहेब ठाकरेंची अॅम्ब्युलन्स ठरली 'देवदूत'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 11:18 IST

हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह,महानायक बिग बी अमिताभ बच्चन आपल्या अभिनयाने आजही रसिकांना घायाळ करत आहेत. तरुण अभिनेत्यांनाही लाजेवल असा उत्साह ...

हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह,महानायक बिग बी अमिताभ बच्चन आपल्या अभिनयाने आजही रसिकांना घायाळ करत आहेत. तरुण अभिनेत्यांनाही लाजेवल असा उत्साह आजही बिग बी अमिताभ यांच्यात पाहायला मिळतो. त्यामुळे कोणत्याही तरुण अभिनेत्यापेक्षा अधिक सिनेमा बिग बी यांच्याकडे आहेत. बिग बी अमिताभ यांच्या  अभिनयासह त्यांच्या फिटनेसचंही कायमच कौतुक होत असते. मात्र आज आपल्यात असणा-या बिग बींवर 1982 साली मोठं संकट ओढवलं होतं. त्यावेळी बिग बी अक्षरक्षः मृत्यूच्या दाढेतून परत आले आहेत हे सर्वश्रुत आहे.1982 साली कुली सिनेमाच्या शूटिंग दरम्यान पुनीत इस्सर यांच्यासह एका फाइट सीनचं चित्रीकरण सुरु असताना अमिताभ यांना मोठी दुखापत झाली.त्यावेळी अमिताभ बच्चन यांना झालेली दुखापत इतकी गंभीर होती की सारा देश हळहळला होता.बिग बी या दुखापतीमधून सुखरुपरित्या बाहेर यावे यासाठी देशभर त्यांच्या फॅन्सकडून प्रार्थना करण्यात येत होत्या. याच दुखापतीबाबतचा एक किस्सा खुद्द महानायक अमिताभ बच्चन यांनी शेअर केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ठाकरे या सिनेमाचा टीझर नुकताच मुंबईत लॉन्च करण्यात आला. यावेळी बिग बी अमिताभ बच्चन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.बिग बी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. दोन्ही कुटुंबातील हे नातं वारंवार पाहायला आणि अनुभवायला मिळालं आहे.त्यामुळे ठाकरे या सिनेमाच्या टीझर लॉन्चवेळी बिग बी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.यावेळी त्यांनी कुली सिनेमाच्या वेळी झालेल्या दुखापती दरम्यानचा एक किस्सा सांगितला. बंगळुरुमध्ये बिग बींना दुखापत झाल्यानंतर ते बराच काळ बेशुद्ध अवस्थेत होते.त्यामुळे त्यांना मुंबईत हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.विमानाद्वारे त्यांना मुंबईत आणण्यात आलं. मुंबई विमानतळावरुन बिग बींना ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात येणार होतं.मात्र त्यावेळी मुंबईत मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत असणा-या बिग बींना विमानतळावरुन ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स उपलब्ध नव्हती.त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची अॅम्ब्युलन्स उपलब्ध झाली,त्यामुळेच ब्रीच कँडी रुग्णालयापर्यंत वेळेत पोहचलो आणि प्राण वाचले असा भावनिक किस्सा बिग बींनी ठाकरे सिनेमाच्या टीझर लॉन्चिंगच्या वेळी सांगितला.त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची ती अॅम्ब्युलन्स महानायकासाठी जणू काही देवदूत ठरली असं म्हटल्यास वावगं ठरु नये.

Also Read:नवाजुद्दीन सिद्दीकीच साकारणार बाळासाहेब ठाकरेंची भूमिका,वाचा सविस्तर!