Join us
Daily Top 2Weekly Top 5

आजही मुंबईतील तो फ्लॅट रिकामाच, भीतीपोटी कोणीही राहायला तयार नाही; दिग्दर्शकाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 17:32 IST

हा फ्लॅट अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील एका इमारतीत आहे.

'भूत' (२००३) हा राम गोपाल वर्मा दिग्दर्शित एक अत्यंत गाजलेला हिंदी हॉरर चित्रपट आहे. ज्यात उर्मिला मातोंडकर मुख्य भूमिकेत होती. उर्मिलाला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी नुकत्याच एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये रएक असा किस्सा सांगितला, जो ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.  ज्या अपार्टमेंटमध्ये या चित्रपटाचे शुटिंग झाले होते, ते २४ वर्षांनंतरही आजही रिकामेच आहे.

'रेड लॉफ्ट फिल्म फेस्टिव्हल'मध्ये संवाद साधताना राम गोपाल वर्मा यांनी सांगितले की, सुरुवातीला हा चित्रपट एखाद्या जुन्या हवेलीत किंवा गोव्याच्या किनाऱ्यावर चित्रित करण्याचा विचार होता. मात्र, वर्मा यांनी मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील एका साध्या फ्लॅटची निवड केली. ते म्हणाले, "हॉरर चित्रपट तेव्हाच प्रभावी ठरतात,जेव्हा प्रेक्षकांना असं वाटतं की, हे माझ्या घरातही घडू शकतं. जेवढं वास्तववादी वातावरण असेल, तितकी भीती जास्त वाटते".

अजय देवगण, उर्मिला मातोंडकर, रेखा आणि नाना पाटेकर यांसारखी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण अवघ्या ३० दिवसांत त्याच अपार्टमेंटमध्ये पूर्ण झाले. २००२ मध्ये या चित्रपटाचे शूटिंग झाले होते, तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे जवळपास २४ वर्षांनंतरही तो फ्लॅट रिकामा आहे. वर्मा यांनी मजेशीरपणे सांगितले की, "चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो फ्लॅट इतका प्रसिद्ध झाला की, आजही भीतीपोटी तिथे कोणीही राहायला तयार नाही. आजही तो फ्लॅट पडका आणि ओसाड अवस्थेत आहे".

हा फ्लॅट अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील एका इमारतीत आहे. राम गोपाल वर्मा यांनी सांगितले की, ते आता त्या इमारतीचे नाव विसरले आहेत, मात्र या फ्लॅटची चर्चा आजही फिल्म इंडस्ट्रीत होते. उर्मिला मातोंडकरचा जबरदस्त अभिनय आणि घरातील त्या काही रहस्यमय दृश्यांमुळे प्रेक्षकांच्या मनात या घराबाबत आजही एक प्रकारची भीती कायम आहे. भूत हा हॉरर चित्रपट आजही प्रेक्षक आवर्जून पाहतात. जर तुम्ही तो अद्याप पाहिला नसेल, तर तो युट्यूबवर उपलब्ध आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : "Bhoot" film's flat remains vacant due to fear: Director reveals.

Web Summary : Ram Gopal Varma revealed that the flat where "Bhoot" was filmed remains vacant even after 24 years. People are scared to live there after the film's release. The director wanted a realistic setting for the horror movie.
टॅग्स :राम गोपाल वर्मामुंबई