Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘या’ भोजपुरी अभिनेत्रीला वाटतेय ‘कोरोना’ची भीती; ढसाढसा रडून चाहत्यांना केली ‘ही’ विनंती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 17:11 IST

ज्यात ती ढसाढसा रडतेय आणि रडत रडत ती तिच्या फॅन्सना मास्क वापरण्याबद्दल सांगतेय. तसेच सॅनिटायझरचा वापर करून कायम तुमचे हात स्वच्छ करत राहा.

सध्या सर्वत्र ‘कोरोना’ या आजाराने थैमाण घातले आहे. प्रत्येक स्तरांवर काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सगळयांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. यामध्ये ही कलाकारमंडळीही मागे नाहीत. एक भोजपुरी अभिनेत्री ‘कोरोना’ च्या भीतीमुळे प्रचंड त्रस्त आहे. तिने अक्षरश: ढसाढसा रडून तिच्या चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. 

हॉलिवूड, बॉलिवूड या सर्वच क्षेत्रात आता ‘कोरोना’ची भीती निर्माण झालीय. भोजपुरीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री राणी चॅटर्जी हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती ढसाढसा रडतेय आणि रडत रडत ती तिच्या फॅन्सना मास्क वापरण्याबद्दल सांगतेय. तसेच सॅनिटायझरचा वापर करून कायम तुमचे हात स्वच्छ करत राहा. ती स्वत: तिचा मास्क विसरली असून ती दुसऱ्यांना मास्क वापरण्याचे आवाहन करते आहे. तिने लिहिले आहे की,‘ मी जी चूक केली ती तुम्ही करू नका.’ असे ती सांगतेय. कोरोनाचा सामना करताना सॅनिटायझर, रूमाल आणि टिशू पेपर कायम स्वत:जवळ बाळगा. जेणेकरून तुम्हाला जंतूसंसर्ग न होण्यास मदत होईल. 

  राणी चॅटर्जी हिच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, राणी ही तिच्या भोजपुरी क्षेत्रात प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्याकडे सध्या कोणताही प्रोजेक्ट नाही. पण, ती ‘खतरों के खिलाडी’ मध्ये कंटेस्टंट म्हणून होती.

टॅग्स :बॉलिवूड