भाग्यश्रीचा मुलगा इमरान हाशमीच्या ‘या’ हिरोइनला करतोय डेट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2017 19:07 IST
गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री भाग्यश्री हिचा मुलगा अभिमन्यू दासानी लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता ...
भाग्यश्रीचा मुलगा इमरान हाशमीच्या ‘या’ हिरोइनला करतोय डेट!!
गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री भाग्यश्री हिचा मुलगा अभिमन्यू दासानी लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता तो त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आला असून, ही त्याच्या अफेअरची आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिमन्यू ‘जन्नत’ या चित्रपटात अभिनेता इमरान हाशमी याच्या लेडी लव्हची भूमिका साकारणाºया सोनल चौहानला डेट करीत आहे. वास्तविक सोनम, अभिमन्यूपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे. सोनम आणि अभिमन्यूची भेट त्याच्या मित्रांमुळे एका पार्टीत झाली होती. याचवेळी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. सोनलने इंडस्ट्रीमध्ये एक अभिनेत्री म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. तर अभिमन्यूही बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. अभिमन्यूला सध्या बºयाचशा चित्रपटांच्या आॅफर आहेत. अभिमन्यू दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्या बॅनरअंतर्गत निर्माण करण्यात येत असलेल्या ‘मर्द को दर्द नही होता’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे, तर सोनल गेल्यावेळेस नंदमुरी बालकृष्ण अभिनित ‘डिक्टेटर’ या तेलगू चित्रपटात बघावयास मिळाली होती. वृत्तानुसार सोनल चौहान गेल्यावर्षी अभिमन्यू दासानी याला भेटली होती. पुढे याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात ती अभिमन्यूच्या बर्थ डे पार्टीत सहभागी झाली होती. याशिवाय दोघेही जस्टिन बीबरच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये पोहोचले होते. दोघांची देहबोली पाहता ते एकमेकांच्या प्रेमात असावेत, असा कयास लावला जात आहे. परंतु अद्यापपर्यंत दोघांकडूनही याबाबतचा कुठलाही दुजोरा दिला नसल्याने त्यांच्यातील अफेअरच्या केवळ चर्चा आहेत. सोनलविषयी सांगायचे झाल्यास यापूर्वीदेखील तिने नाव अभिनेता नील नितीन मुकेश आणि सिद्धार्थ माल्या यांच्याशी जोडले गेले आहे. शिवाय सोनलचे नाव सलमान खानचा भाऊ अरबाज खान याच्यासोबतदेखील जोडण्यात आले आहे. मात्र काहीही असो, सध्या सोनल आणि अभिमन्यूची लव्हस्टोरी चांगलीच चर्चेत आहे.