भाग्यश्री लिमये ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. भाग्यश्रीने अलीकडेच हिंदी वेबसीरिज आणि सिनेमांमध्येही तिची ओळख निर्माण केलीय. आज तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. भाग्यश्री लिमये सोशल मीडियावर सक्रीय असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. रोजच्या धकाधकीच्या जीवनात धावपळ करणाऱ्या भाग्यश्री लिमयेनं या सगळ्या गोंधळातून थोडासा ब्रेक घेतला आहे.
भाग्यश्री लिमयेने तिच्या बिझी शेड्युलमधून थोडीशी विश्रांती घेतली असून तिने थेट तिचं गाव सोलापूरला गाठलं आहे. भाग्यश्री लिमये तिच्या गावी गेली असून इथला एक सुरेख व्हिडीओ तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने तिच्या घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे. सोलापूरात गेल्यावर भाग्यश्री आपल्या आईसोबत बँकेत गेली, तिथली काम झाल्यावर तिनं आईसोबता ऊसाचा रस, कचोरी, भेळ आणि पाणीपुरीचा आस्वाद घेतला.
भाग्यश्री लिमयेचं बालपण सोलापूरमध्ये गेलं आहे. तिनं आपले प्राथमिक म्हणजे चौथीपर्यंतचे शिक्षण हे लिटल फ्लावर्स कॉन्व्हेंट स्कूल सोलापूर इथून पूर्ण केले. तर बारावीपर्यंत शिक्षण हे इंडियन मॉडर्न स्कूल सोलापूर येथून पूर्ण केले. त्यानंतर भाग्यश्री हिने मंगळवेढा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सोलापूर येथून बीसीएची डिग्री घेतली. तर आपले पुढील शिक्षणासाठी भाग्यश्री हिने पुणे गाठले.
अभिनयात एन्ट्री
भाग्यश्री हिने पुण्याच्या सिम्बॉयसिस कॉलेजमधून एमसीएची डिग्री घेतलेली आहे. भाग्यश्री लिमयेसाठी २०१७ हे खूप महत्त्वाचे वर्ष ठरले २०१७ साली आलेल्या कलर्स मराठी वरील घाडगे अँड सून्स या मालिकेतून तिनं मालिकाक्षेत्रात दमदार पदार्पण केले. ही तिची पहिलीच मालिका होती. आपल्या पहिल्याच मालिकेतून भाग्यश्री घराघरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली. तसेच भाग्यश्रीला भाडीपा या युट्यूब चॅनलच्या कांदे पोहे या व्हिडीओ सीरिजमुळे विशेष लोकप्रियता मिळाली.
Web Summary : Actress Bhagyashree Limaye visited her hometown Solapur, taking a break from her busy schedule. She shared a video showcasing her house and enjoyed local treats with her mother.
Web Summary : अभिनेत्री भाग्यश्री लिमये ने अपनी व्यस्त दिनचर्या से छुट्टी लेकर अपने गृहनगर सोलापुर का दौरा किया। उन्होंने अपने घर का एक वीडियो साझा किया और अपनी माँ के साथ स्थानीय व्यंजनों का आनंद लिया।