Join us

'भाभी २'चा बिकिनीत किलर लूक! तृप्ती डिमरीच्या बोल्ड फोटोंवर रूमर्ड बॉयफ्रेंडनं केली ही कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 13:00 IST

Tripti Dimri : 'ॲनिमल' या चित्रपटानंतर अभिनेत्री तृप्ती डिमरी चाहत्यांची पहिली पसंती ठरली आहे. तृप्ती डिमरी बोल्ड लूकने पुन्हा एकदा सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) स्टारर 'ॲनिमल' (Animal Movie) या चित्रपटाने अभिनेत्री तृप्ती डिमरी(Tripti Dimri)च्या कारकिर्दीने एक नवा टप्पा गाठला आहे. 'ॲनिमल'(Animal Movie)मधील भाभी २ म्हणून तृप्ती अनेकदा चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असते. इतकेच नाही तर ती तिच्या किलर लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते.

दरम्यान, तृप्तीने नुकतेच सोशल मीडियावर बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे. तिचे हे फोटो पाहून कथित बॉयफ्रेंड सॅम मर्चंट कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. तृप्ती डिमरीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये काळ्या आणि हिरव्या रंगाची बिकिनी परिधान केलेली दिसत आहे. यावेळी तृप्तीने तिची कर्वी फिगर फ्लाँट केली आहे. 

अभिनेत्रीचे हे लेटेस्ट फोटो पाहून ती खऱ्या आयुष्यात किती हॉट आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो. अफवा असलेला बॉयफ्रेंड सॅम मर्चंटने या फोटोंवर कमेंट करून तिची प्रशंसा केली आहे आणि सुंदर अशी कमेंट केली आहे. तृप्तीचे हे फोटो पाहून एका चाहत्याने तिची तुलना केंडल जेनरशीही केली आहे. तिचे हे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. सध्या तृप्ती इटलीच्या दौऱ्यावर आहे.

या सिनेमांमध्ये झळकणार तृप्ती तृप्ती डिमरीकडे आगामी काळात अनेक सिनेमे आहेत. यामध्ये कार्तिक आर्यनचा हॉरर कॉमेडी भूल भुलैया ३, बॅड न्यूज आणि राजकुमार रावचा विकी विद्या का वो व्हिडिओ यांसारख्या अनेक चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे.

टॅग्स :तृप्ती डिमरी