झी सिने पुरस्कारात या कलाकारांनी मारली बाजी, हा अभिनेता ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 13:03 IST
झी सिने पुरस्कार सोहळा नुकताच धुमधडाक्यात पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला सलमान खान, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार, ...
झी सिने पुरस्कारात या कलाकारांनी मारली बाजी, हा अभिनेता ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता
झी सिने पुरस्कार सोहळा नुकताच धुमधडाक्यात पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला सलमान खान, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार, आलिया भट्ट, जॅकलिन फर्नांडिस, करण जोहर, भूमी पेडणेकर, श्रीदेवी, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, शाहिद कपूर, रणवीर सिंग, राधिका आपटे, सिद्धार्थ मल्होत्रा यांनी स्टायलिश अंदाजात हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी अफलातून परफॉर्मन्स सादर केले. प्रियांका चोप्राच्या परफॉर्मन्सला तर उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. झी सिने पुरस्कार मराठी आणि हिंदी चित्रपटांनाही देण्यात आला. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेकजण या पुरस्कार सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते.झी सिने पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेतः मराठी चित्रपटसर्वोत्कृष्ट चित्रपट - फास्टर फेणेसर्वोत्कृष्ट अभिनेता - अमेय वाघ (फास्टर फेणे)सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - सोनाली कुलकर्णी (कच्चा लिंबू)हिंदी चित्रपटसर्वोत्कृष्ट चित्रपट - गोलमालसर्वोत्कृष्ट अभिनेता - वरुण धवन (बद्रीनाथ की दुल्हनिया)सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - श्रीदेवी - मॉमसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अश्विनी अय्यर तिवारी - बरेली की बर्फीसर्वोत्कृष्ट खलनायक - राज राजून ( सिक्रेट सुपरस्टार)सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री - मेहेर वीज (सिक्रेट सुपरस्टार)सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - अनिल कपूर (मुबारक)सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक - अद्वैत चंदन (सिक्रेट सुपरस्टार)सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता - मॅटिन रे टंगू (ट्युबलाइट)सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री - निधी अग्रवाल (मुन्ना मायकल)सर्वोत्कृष्ट चित्रपट (प्रेक्षकांची पसंती) - टॉयलेट एक प्रेमकथासर्वोत्कृष्ट अभिनेता (प्रेक्षकांची पसंती) - अक्षय कुमार (जॉली एलएलबी २)सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (प्रेक्षकांची पसंती) - आलिया भट्ट (बद्रिनाथ की दुल्हनिया)एक्सट्रोओरडिनरी इमपॅक्ट अॅवॉर्ड - टॉयलेट एक प्रेमकथाएक्सट्रोओरडिनरी लिजंड अॅवॉर्ड - अमिताभ बच्चनएक्सट्रोओरडिनरी फ्रंचाईस अॅवॉर्ड - बाहुबलीएक्सट्रोओरडिनरी इमपॅक्ट अॅवॉर्ड (फिमेल) - तापसी पन्नू (नाम शबाना)एक्सट्रोओरडिनरी इमपॅक्ट अॅवॉर्ड (मेल) - राजकुमार राव (न्यूटन)Also Read : प्रियांका चोप्राने झी सिने पुरस्कार सोहळ्यात परफॉर्मन्स सादर करण्यासाठी घेतले तब्बल इतके पैसे