Join us  

Bell Bottom : अक्षयच्या 'बेलबॉटम'चा ट्रेलर लाँच, प्लॅनिंग, अ‍ॅक्शन अन् 1984 मधील महत्त्वाचं मिशन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 7:43 PM

Bell Bottom : अनेक अभिनेत्यांनी आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली असून अभिनेता अक्षय कुमार (Actor Akshay Kumar) यानेदेखील आपल्या 'बेलबॉटम' (Bellbottom) सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्यानंतर, आज सायंकाळी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. 

ठळक मुद्देकोरोनाच्या काळात (Coronavirus) सगळेच व्यवहार ठप्प झाले होते. त्याचप्रमाणे बॉलिवूडमधील चित्रपटांचे शूटिंगदेखील थांबले होते. मात्र आता सरकाने चित्रीकरणाला परवानगी दिल्यानंतर अनेक चित्रपटांना सुरूवात झाली आहे.

मुंबई - कोरोना आला अन् सिनेसृष्टीला आपल्यापासून दूर घेऊन गेला. कारण, अद्यापही चित्रपटगृहे खुली करण्यात आली नाहीत. त्यामुळे, नवनवीन चित्रपटंही प्रदर्शित होणे टाळले जात आहे. त्यातच, ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करुन आता चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसापूर्वी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा राधे चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर, आता बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा बेलबॉटम प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. 

कोरोनाच्या काळात (Coronavirus) सगळेच व्यवहार ठप्प झाले होते. त्याचप्रमाणे बॉलिवूडमधील चित्रपटांचे शूटिंगदेखील थांबले होते. मात्र आता सरकाने चित्रीकरणाला परवानगी दिल्यानंतर अनेक चित्रपटांना सुरूवात झाली आहे. अनेक अभिनेत्यांनी आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली असून अभिनेता अक्षय कुमार (Actor Akshay Kumar) यानेदेखील आपल्या 'बेलबॉटम' (Bellbottom) सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्यानंतर, आज सायंकाळी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे.  बेटबॉटम हा कोडवरड असून विमान अपहरणावर आधारीत हा चित्रपट आहे. अक्षय कुमार या चित्रपटात गुप्तहेराची भूमिका निभावत असून विमानातील 212 प्रवाशांना वाचवण्याचं मिशन त्याच्याकडे सोपविण्यात आल्याचे दिसून येते. चित्रपटाचे शूटिंग दुबई, स्कॉटलंडमध्ये झाले असून अक्षय कुमार याच्याबरोबर लारा दत्ता, वाणी कपूर, आदिल हुसेन, हुमा कुरेशी देखील दिसून येणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन रणजित तिवारी यांनी केलं असून दीपशिखा देशमुख आणि जॅकी भगनानी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

दरम्यान, यापूर्वी 9 सप्टेंबर रोजी अक्षय कुमारचा वाढदिवस असून 'बेलबॉटम'च्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटातील अक्षय कुमारचा नवीन लूक असलेला फोटो रिव्हिल केला होता. अक्षय कुमारचा हा लुक रिव्हिल करून त्याच्या चाहत्यांना देखील खुश करण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे. त्यानंतर, आज ट्रेलर रिलीज झाला आहे.  

टॅग्स :बॉलिवूडअक्षय कुमारसिनेमाविमान