Join us
Daily Top 2Weekly Top 5

​बेबो म्हणते, मला काय त्याचे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 17:26 IST

हृतिक रोशन आणि कंगना रानोट यांच्यातील कॉन्ट्रव्हर्सिच्या बातम्यांनी मीडिया ढवळून लिघाला. दोघांमधील अतिशय खासगी वाद चव्हाट्यावर आल्याने व कोर्टापर्यंत ...

हृतिक रोशन आणि कंगना रानोट यांच्यातील कॉन्ट्रव्हर्सिच्या बातम्यांनी मीडिया ढवळून लिघाला. दोघांमधील अतिशय खासगी वाद चव्हाट्यावर आल्याने व कोर्टापर्यंत गेल्याने अनेकांना धक्का बसला. बी-टाऊन अर्थात बॉलिवूडमधील कंगना-हृतिकच्या मित्रांनाही यामुळे धक्का बसला. हृतिकसोबत अनेक चित्रपटात काम केलेल्या आणि भूतकाळात हृतिकची जवळची मैत्रीण मानल्या गेलेल्या करिना कपूरलाही पत्रकारांनी सहज म्हणून कंगना-हृतिकच्या कॉन्टवर्सीबाबत प्रश्न विचारला. करिना नेमके काय उत्तर देते, हे ऐकण्याची उत्सूकता असतानाच करिनाने यावर चांगलेच तुडसे उत्तर दिले. ‘मला यावर खरचं काही बोलता येणार नाही. हा वाद अतिशय खासगी आणि दु:खदायक आहे. मला त्या दोघांबद्दलही सहानुभूती आहे. पण मी यावर काहीच बोलू शकत नाही. खरं तर, माझ्या आयुष्याचा याच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे मला यामुळे काहीही फरक पडत नाही,’असे बेबो म्हणाली.