Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय म्हणता आयुषमान खुराणाच्या सासूबाईने रामायणात केले काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 10:13 IST

चर्चा सुरू झाली आणि बघता बघता ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली...

ठळक मुद्देअद्याप आयुषमानची यावरची प्रतिक्रिया आलेली नाही.

दूरदर्शनवर गाजत असलेल्या रामायण या मालिकेतील सगळ्या व्यक्तिरेखा आणि या व्यक्तिरेखा साकारणारे कलाकार सध्या चर्चेत आहेत. अशात अभिनेता आयुषमान खुराणाच्या सासूबाईंनी रामायण या मालिकेत काम केल्याची  चर्चा आहे. होय, आयुषमानची पत्नी ताहिरा कश्यपची आई अनीता कश्यप यांनी रामायणात त्रिजटाची भूमिका साकारली होती, अशी चर्चा सुरू झाली आणि बघता बघता ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली.

त्रिजटा ही रावणाचा लहान भाऊ विभीषण  त्याची पत्नी सरमा यांची लहान मुलगी होती. रावणाने सीतेचे हरण करून तिला अशोक वाटिकेत ठेवले होते. याठिकाणी रावणाने सीतेवर पहारा ठेवण्यासाठी त्रिजटा व अन्य काहींना नेमले होते.

आधी त्रिजटा सीतेच्याविरोधात होती. पण नंतर सीतेवर मी माया करू लागली होती. सीतेचे दु:ख तिने जाणले होते. सीतेला सांत्वना देण्यासोबतच रामाबद्दलची प्रत्येक माहिती पोहोचवण्याचे काम त्रिजटेने केले होते.

 

अशात ताहिराच्या आईने त्रिजटेची भूमिका साकारली होती, अशी चर्चा सुरू झाली. ही बातमी कुठून आली, कशी आली, हे माहित नाही़ पण हो, ही बातमी आल्यावर सगळेच हैराण झाले. अर्थात ताहिराने या चर्चांना पूर्णविराम दिला. होय, रामायणात माझ्या आईने साकारलेल्या भूमिकेबद्दलच्या बातमीत काहीही तथ्य नाही. माझी आई शिक्षणतज्ज्ञ होती आणि तिचा या मालिकेशी काहीही संबंध नाही, काहीही...’, असे ट्विट ताहिराने केले.  अद्याप आयुषमानची यावरची प्रतिक्रिया आलेली नाही.

टॅग्स :आयुषमान खुराणारामायण