Join us  

सौरव गांगुलीची भूमिका साकारणार आयुष्मान खुराना? लवकरच होणार शूटिंगला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 8:15 PM

आयुष्मान खुराना सौरव गांगुलीच्या बायोपीकमध्ये दिसणार असल्याचं बोललं जात आहे. 

बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना ड्रीम गर्ल-२  सिनेमाच्या प्रमोशन मध्ये भलताच बिझी होता. पण आता सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आयुष्मानच्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली आहे. आता आयुष्मान खुराना सौरव गांगुलीच्या बायोपीकमध्ये दिसणार असल्याचं देखील बोललं जात आहे. 

एका मुलाखतीमध्ये बोलताना त्याला सौरव गांगुलीच्या बायोपीकमधील मुख्य भूमिकेबाबत प्रश्न विचारला गेला होता. यावर त्याने स्पष्ट उत्तर दिले नाही. तो म्हणाला, मी सध्या यावर काहीही बोलणार नाही. आपण अधिकृत घोषणेची वाट पाहिली पाहिजे. सौरव गांगुलीची मुख्य भूमिका रणबीर कपूर साकारणार असल्याचे यापूर्वी बोलले जात होते. 

रिपोर्ट्सनुसार, या वर्षाच्या अखेरीस बायोपिकचे शूटिंग सुरू होईल. यावर्षी २६ मे रोजी निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग सौरव गांगुलीला भेटण्यासाठी कोलकाता येथे पोहचले होते.  सौरव गांगुलीच्या अनेक न ऐकलेल्या आणि रंजक कथांचा चित्रपटाच्या पटकथेत समावेश करण्यात आलाय. अलीकडेच एका मुलाखतीमध्ये सौरव गांगुली म्हणाला होता की, चित्रपटाची स्क्रिप्ट जवळपास फायनल झाली आहे. सुमारे २०० ते २५०  कोटी रुपयांच्या बजेटसह हा चित्रपट मोठ्या बॅनरसह तयार केला जाऊ शकतो.

सनी देओलच्या गदर-२ आणि शाहरुख खानच्या आगामी जवान चित्रपटाची क्रेझ असतानाही आयुष्मान खुरानाचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. sacnilk.com च्या रिपोर्टनुसार, ड्रीम गर्ल-२ ने रिलीज झाल्यापासून जवळपास ९१.४३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

हा चित्रपट २०१९ मध्ये रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट ड्रीम गर्लचा सिक्वेल आहे. या चित्रपटात परेश रावल, मनजोत सिंग, सीमा पाहवा, अन्नू कपूर, राजपाल यादव, अभिषेक बॅनर्जी, असरानी, ​​विजय राज आणि मनोज जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

टॅग्स :आयुषमान खुराणाबॉलिवूडसौरभ गांगुली