Join us
Daily Top 2Weekly Top 5

ताहिरा कश्यपने हा स्पेशल व्हिडिओ शेअर करत आयुषमान खुराणाला दिल्या अ‍ॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 16:42 IST

ताहिराने शेअर केलेल्या व्हिडिओत ताहिरा आणि आयुषमान यांचा आजपर्यंतचा प्रवास आपल्याला पाहायला मिळत आहे. यामधील काही फोटों प्रचंड जुने आहेत.

ठळक मुद्दे या फोटोंमध्ये तर ते दोघे इतके वेगळे दिसत आहेत की, त्यांना ओळखणे देखील कठीण जात आहे.

आयुषमान खुराणा आणि ताहिरा कश्यप हे लहानपणापासूनचे फ्रेंड्स असून अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी २००८ साली लग्न केले. त्यांना वीराजवीर आणि वरुष्का अशी दोन मुलं आहेत. वीराजवीरचा जन्म 2012 मधील तर वरुष्काचा जन्म 2014 मधील आहे. त्यांच्या अफेअरला आज 20 वर्षं पूर्ण झाली असून या निमित्ताने ताहिराने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिने खास अंदाजात आयुषमानला अ‍ॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ताहिराने शेअर केलेल्या व्हिडिओत ताहिरा आणि आयुषमान यांचा आजपर्यंतचा प्रवास आपल्याला पाहायला मिळत आहे. यामधील काही फोटों प्रचंड जुने आहेत. या फोटोंमध्ये तर ते दोघे इतके वेगळे दिसत आहेत की, त्यांना ओळखणे देखील कठीण जात आहे. 

ताहिरा आणि आयुषमान यांना बॉलिवूडमधील क्यूट कपल मानले जाते. आयुषमानने ताहिराला कसे प्रपोज केले होते हे त्याने गेल्या वर्षी इन्स्टाग्रामद्वारे सांगितले होते.  त्याने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले होते की, ते 2001 चे वर्षं होते... आम्ही आमच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत होतो. मी रात्री ताहिरासोबत फोनवर बोलत होतो. रात्री 1 वाजून 48 मिनिटांनी फोनवर बोलत असताना माझ्या मनातील भावना मी ताहिराला सांगितल्या होत्या. त्यावेळी ब्रायन एडम्सचे गाणे माझ्या डोक्यात घुमत होते. त्या गोष्टीला 19 वर्षं झाली.

टॅग्स :आयुषमान खुराणाताहिरा कश्यप