Join us  

आयशा जुल्काचे ‘बोल्ड’ निर्णय;  21 वर्षांनी मोठ्या नानांसोबत इंटिमेट सीन आणि नंतर लिव्ह इन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 11:16 AM

Ayesha Jhulka Birthday : आयशाने आपल्या करिअरमध्ये आमिर खान, मिथुन, अक्षय कुमार आणि नाना पाटेकरसारख्या दिग्गजांसोबत काम केलं. पण चित्रपटांपेक्षा ती तिच्या पर्सनल लाईफमुळेच अधिक चर्चेत राहिली.

ठळक मुद्दे2003 मध्ये आयशाने एका बिझनेसमॅनसोबत लग्न केलं. 

90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आयशा जुल्का (Ayesha Jhulka ) आज तिचा 49 वा वाढदिवस साजरा करतेय. आयशाचा खास लक्षात राहणारा सिनेमा म्हणजे आमिर खानसोबतचा ‘जो जिता वही सिकंदर’. आयशाने आपल्या करिअरमध्ये आमिर खान, मिथुन, अक्षय कुमार आणि नाना पाटेकरसारख्या दिग्गजांसोबत काम केलं. पण चित्रपटांपेक्षा ती तिच्या पर्सनल लाईफमुळेच अधिक चर्चेत राहिली. पर्सनल लाईफमधील तिच्या काही बोल्ड निर्णयांची चर्चा आजही होते, ते म्हणूनच.  

अरमान कोहली...एकेकाळी आयशा अरमान कोहलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण कालांतरानं दोघांचं ब्रेकअप झालं. या ब्रेकअपवर आयशा बोलली होती. अरमान कोहली ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. तो असा माणूस होता, ज्याच्यासोबत मी कधीही आयुष्य घालवू इच्छिणार नाही, असं आयशा म्हणाली होती.

अक्षय कुमारआयशाला खरी ओळख मिळाली ती अक्षय कुमारसोबतच्या  ‘खिलाडी’ या सिनेमानं. ही ऑनस्क्रीन जोडी लोकांना खूप भावली. यानंतर ‘वक्त हमारा है’मध्ये ही जोडी पुन्हा दिसली. एकत्र काम करता करता आयशा व अक्षयच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्यात. अर्थात अक्षय त्याकाळी मुलींना फार सीरिअसली घ्यायचा नाही. आयशाला ही गोष्ट कळायला वेळ लागला नाही. याचमुळं आयशानं लवकरच अक्षयसोबत ब्रेकअप केलं. अर्थात या ब्रेकअपनंतर दीर्घकाळ ती तिच्या कामावर फोकस करू शकली नव्हती.

नाना पाटेकरआयशानं केवळ बिकिनी घालावी लागणार म्हणून ‘प्रेम कैदी’ हा सिनेमा नाकारला होता. पुढे 2003 मध्ये याच आयशाने ‘आंच’ नावाच्या सिनेमात कधी नव्हे इतके बोल्ड सीन्स दिले होते. ते सुद्धा नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यासोबत. याच काळात आयशा व नाना रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी नाना पाटेकर हे पत्नीपासून वेगळे राहत होते. (Ayesha Jhulka live in relationship with Nana Patekar) याच काळात नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांच्याही अफेअरची जोरदार चर्चा  होती. मात्र, ‘आंच’ सिनेमानंतर आयशा आणि नानाच्या रोमान्सची चर्चा रंगू लागली होती. रिपोर्ट्सनुसार, मनीषाच्या कानावर दोघांची चर्चा आली तेव्हा ती फार इनसिक्योर झाली. चर्चा अशीही होती की, मनीषाने नाना पाटेकर आणि आयशा जुल्का यांना एकाच रूममध्ये रंगेहाथ पकडलं होतं. संतापलेल्या मनीषाने आयशाला त्यावेळी बरंच सुनावलं होतं. पण असंही सांगितलं जातं की, नंतर नाना मनीषाचा राग घालवण्यातही यशस्वी ठरले होते. नानासोबत लिव्ह-इननाना आयशापेक्षा 21 वर्षांनी मोठे होते. पण रिपोर्टनुसार,  मनीषापासून वेगळं झाल्यावर नाना व आयशा लिव्ह इनमध्ये राहू लागले होते.अर्थात हे नातं फार काळ टिकलं नाही. नानांच्या लहरी स्वभावामुळं आयशानं त्यांच्यापासून दूर जाणं पसंत केलं. यानंतर 2003 मध्ये आयशाने एका बिझनेसमॅनसोबत लग्न केलं. 

टॅग्स :आयशा जुल्कानाना पाटेकरअक्षय कुमारबॉलिवूड