Join us

'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 17:42 IST

या सिनेमात विनोद आणि मराठी अभिनेत्रीचे अनेक अंगावर काटा आणणारे सीन्स आहेत.

'पंचायत' सीरिजचा मोठा चाहतावर्ग आहे. ओटीटीवर सर्वात गाजलेल्या सीरिजपैकी ही एक सीरिज आहे. प्रधानजी, सचिवडी, विकास, प्रल्हाद चा, मंजू देवी, रिंकी या भूमिकांवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं. तर भूषण (बनराकस), क्रांती देवी, विनोद यांनीही मनात घर केलं. 'पंचायत'चा चौथा सीझन नुकताच आला. या सीझनमध्ये विनोद भाव खाऊन गेला. तुम्हाला माहितीये का विनोदने एका मराठमोळ्या अभिनेत्रीसोबतही काम केलं आहे.

अभिनेता अशोक पाठकने (Ashok Pathak) सीरिजमध्ये विनोद ही भूमिका साकारली आहे. पहिल्या सीझनपासूनच तो विनोद नावानेच लोकप्रिय झाला. आताच्या सीझनमध्ये तर तो खरा हिरो ठरला. अशोक पाठक 'सिस्टर मिडनाईट' या सिनेमातही दिसला. मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेसोबत (Radhika Pathak) त्याने स्क्रीन शेअर केली. सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चा झाली. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये याचं स्क्रीनिंग झालं. तसंच बाफ्टा अवॉर्ड्स मध्ये याला नॉमिनेशन मिळालं. अशोकने सिनेमात राधिकाच्या नवऱ्याची भूमिका साकारली होती.

'सिस्टर मिडनाईट' ३० मे रोजी भारतात रिलीज झाला. राधिका उमा या भूमिकेत दिसली. तर अशोक पाठक गोपाळच्या भूमिकेत होता. छाया कदम, स्मिता तांबेचीही यात भूमिका आहे. हा सिनेमा डार्क कॉमेडी ड्रामा आहे. उमाचं गोपाळशी अरेंज मॅरेज होतं. मात्र लग्नानंतर तिच्यासोबत अनेक घटना घडतात ज्या अंगावर काटा आणणाऱ्या असतात. सिनेमातील दोघांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. करण कंधारी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

टॅग्स :राधिका आपटेबॉलिवूडसेलिब्रिटी