Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : "थोडा फुँककर खाइये, नाहीतर...", रस्त्यावर झणझणीत वडापाव खात होता बॉलिवूड अभिनेता, पुणेकर काकूंनी थेट सल्लाच दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 13:38 IST

एका पुणेकर काकूंचा व्हिडीओ समोर आला आहे. या काकूंनी थेट बॉलिवूड अभिनेत्यालाच सल्ला दिला आहे. व्हिडीओत वडापाव खात असलेल्या बॉलिवूड अभिनेत्याला काकू सल्ला देताना दिसत आहेत. 

पुणे तिथे काय उणे असं आपण नेहमीच म्हणतो. जगात भारी पुणेकरांची कशाशीच तोड नाही. पुणेकरांवरील अनेक रील्सही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका पुणेकर काकूंचा व्हिडीओ समोर आला आहे. या काकूंनी थेट बॉलिवूड अभिनेत्यालाच सल्ला दिला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत वडापाव खात असलेल्या बॉलिवूड अभिनेत्याला काकू सल्ला देताना दिसत आहेत. 

बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी त्यांच्या भूमिकांसाठी ओळखले जातात. आशिष विद्यार्थी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. त्यांना फिरण्याची आवड असून वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडीओ ते शेअर करत असतात. अनेक ठिकाणांच्या खाण्याच्या पदार्थांचे व्हिडीओही आशिष विद्यार्थी शेअर करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी आशिष विद्यार्थी हे पुण्याला गेले होते. तिथे त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या वडापावच्या गाडीवर वडापाव खाल्ला. याचा व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

या व्हिडीओमध्ये दिसतंय की आशिष विद्यार्थी हे गाडीवर भजी तळताना दिसत आहे. त्यानंतर ते वडापावचा आस्वाद घेतात. झणझणीत वडापावसोबत ते तिखट मिरचीही खाताना दिसत आहेत. व्हिडीओत पुढे दिसतंय की आशिष विद्यार्थी वडापाव खात असताना त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या पुणेरी काकू त्यांना "थोडा फुँककर खाइये...जलेगा बाद मे", असा सल्ला देत आहेत. त्यांना सल्ला ऐकून आशिष विद्यार्थीही आश्चर्यचकित झाले. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Aunty advises Bollywood actor Ashish Vidyarthi on eating Vada Pav.

Web Summary : Ashish Vidyarthi enjoyed Pune's street-side Vada Pav. A Pune aunty advised him to blow on it, cautioning about the spice. The video went viral.
टॅग्स :आशिष विद्यार्थीपुणे