Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या बहिणींच्या सावलीत राहूनही निर्माण केलं स्वतःचं अस्तित्व; कोण आहेत उषा मंगेशकर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 13:08 IST

उषा मंगेशकरलता दीदींच्या सेवेसाठी आयुष्यभर राहिल्या अविवाहित, केलेला मोठा त्याग

Usha Mangeshkar : मंगेशकर घराण्याने भारतीय संगीत विश्वावर सात दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवले आहे. लता दीदी आणि आशा ताई या दोन नावांनी संगीताचे शिखर गाठले असले तरी, याच कुटुंबातील सर्वात धाकटी बहीण उषा मंगेशकर यांनीही आपल्या सुरांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच आशा भोसले यांच्या अंत्यसंस्कारावेळी उषा मंगेशकर यांची झलक दिसली. लाइमलाइटपासून दूर राहणाऱ्या उषा मंगेशकर यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

उषा मंगेशकर या कुटुंबातील धाकट्या होत्या. लहानपणापासूनच त्यांनी मोठ्या बहिणींकडून गायनाचे धडे घेतले. १९५२ मध्ये 'सुबह का तारा' या चित्रपटातील "भाभी आई बड़ी धूमधाम से..." या गाण्याद्वारे त्यांनी पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण केले. मोठ्या दोन बहिणींनी आधीच बॉलिवूडवर पकड मिळवलेली असताना, उषा मंगेशकर यांनी चिकाटीने स्वतःची जागा निर्माण केली. उषा मंगेशकर यांच्या करिअरला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ती १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जय संतोषी माँ' या चित्रपटामुळे. या चित्रपटातील त्यांनी गायलेली सर्व भजने घराघरात पोहोचली. 

मोठ्या बहिणीसाठी त्याग; कधीही केलं नाही लग्नउषा मंगेशकर यांच्याबद्दल एक गोष्ट आवर्जून सांगितली जाते, ती म्हणजे त्यांचा त्याग. असे म्हटले जाते की, आपली मोठी बहीण लता मंगेशकर यांची सेवा आणि काळजी घेण्यासाठी उषा मंगेशकर यांनी कधीही लग्न केले नाही. ९० वर्षांच्या उषा मंगेशकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी आणि संगीतासाठी समर्पित केले आहे. मंगेशकर कुटुंबातील त्या एक मजबूत कणा राहिल्या आहेत.

अश्रू नयनांनी आशा ताईंना दिला निरोपआशा भोसले यांच्या निधनानंतर संपूर्ण मंगेशकर कुटुंब शोकाकुल झाले आहे. आपल्या मोठ्या बहिणीला निरोप देताना उषा मंगेशकर यांनाही प्रचंड दुःख झाले. मुंबईत पार पडलेल्या अंत्यविधीला त्यांनी उपस्थिती लावून आपल्या लाडक्या 'आशा ताईं'ना भावपूर्ण श्रद्धांजली दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Usha Mangeshkar: Defining herself beyond Lata and Asha's shadows.

Web Summary : Usha Mangeshkar, though lesser-known than her sisters Lata and Asha, carved her own niche in music. Her career breakthrough came with 'Jai Santoshi Maa'. She remained unmarried, dedicating her life to family and music, a pillar of strength for the Mangeshkar family. She paid tearful tribute to Asha Bhosle.
टॅग्स :आशा भोसलेलता मंगेशकर