Join us

शाहरुख खानची होणारी सून? 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरला आर्यनसोबत दिसली 'ही' अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 12:51 IST

काल 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरला आर्यन खानची गर्लफ्रेंड सर्वांना दिसली. त्यामुळे दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना चांगलंच उधाण आलेलं दिसतंय

काल मुंबईत 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' सिनेमाचा प्रीमियर झाला. या प्रीमियरला बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. शाहरुख खानचा लेक आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. लेकाच्या पहिल्या वेबसीरिजसाठी संपूर्ण खान कुटुंब उत्साहात दिसलं. अशातच 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरला आर्यन खान सध्या जिला डेट करतोय त्या अभिनेत्रीची झलक दिसली. त्यामुळे शाहरुख खानच्या होणाऱ्या सुनेची चांगलीच चर्चा आहे. कोण आहे की?

या अभिनेत्रीला डेट करतोय आर्यन?

शाहरुखचा लेक आर्यन खान हा सध्या ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री लॅरिसा बोनेसीला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या शोच्या प्रीमियरमध्ये ती दिसली. लॅरिसाच्या बोल्ड लूकने तिने रेड कार्पेटवर खऱ्या अर्थाने लाइमलाइट लुटली. लॅरिसाने खास काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला होता. यासोबत काळ्या रंगाच्या हाय हील्स आणि डायमंड इअररिंग्स, ब्रेसलेट परिधान करुन ग्लॅमरस लूक केला होता. लॅरिसा ब्राझिलियन मॉडेल असली तरी तिने बॉलिवूडमध्येही काम केलंय.

आर्यन खानचे नाव बऱ्याच काळापासून लॅरिसा बोनेसीसोबत जोडले जात आहे. लॅरिसाने अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमसोबत काम केलं आहे. 'देसी बॉईज' चित्रपटातील 'सुबह होने न दे' या गाण्यातून लॅरिसाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याशिवाय, तिने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केले आहे. लॅरिसा प्रसिद्ध गायक गुरु रंधावासोबत 'सूरमा-सूरमा' गाण्यातही झळकली होती.

हा प्रीमियर आर्यन खानसाठी एक महत्त्वाचा क्षण होता, कारण तो पहिल्यांदा दिग्दर्शक म्हणून लोकांसमोर येत आहे. या खास क्षणी लॅरिसाने हजेरी लावली, ज्यामुळे आर्यन आणि तिच्यातील रिलेशनशिपच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. या दोघांनी मात्र त्यांच्या नात्याचा अजून जाहीर खुलासा केला नाहीये. तरीही शाहरुखची होणारी सून आणि आर्यन खानची गर्लफ्रेंड म्हणून लॅरिसाकडे पाहिलं जातंय.

टॅग्स :शाहरुख खानगौरी खानआर्यन खानअबराम खानसुहाना खानरिलेशनशिपलग्नदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट